शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचार्‍यांचे उपोषण सुरू

By admin | Updated: May 28, 2014 00:25 IST

जालना : वीज कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मस्तगड येथील कार्यकारी अभियंता विभाग क्र. १ यांच्या कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.

 जालना : वीज कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मस्तगड येथील कार्यकारी अभियंता विभाग क्र. १ यांच्या कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. कामगार विरोधी धोरणास वीज कामगार त्रस्त झाले असून, निलंबन, चार्जशीट, दंडात्मक कारवाई असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड तणाव असून, त्यांचे मनोधैर्य खचले आहे. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी व कामगारांवरील अन्यायाबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांकडून या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली, असा आरोप फेडरेशनने केला आहे. ओ.टी. बिले, लाँग स्टे कर्मचार्‍यांच्या बदल्या, अन्यायकारक बदल्या या प्रमुख प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचे हत्यार उगारण्यात आले असल्याचे फेडरेशनने नमूद केले आहे. दरम्यान उपोषणाचा पहिला टप्पा असून, आगामी काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मराठवाडा संघटक पी.एम. कुलकर्णी, झोनल अध्यक्ष जे.डी. डोळसे, उपझोन सचिव अर्जुन लहाने हे या उपोषणाचे नेतृत्व करीत आहेत. उपोषणात अयाज खान पठाण, बी.टी. कातकडे, सर्जेराव भांदरगे, आर.उी. पुंगळे, एस.के. चित्राल, एस.बी. खरात, संदीप केरकर, बी.एल. जगताप, एन.आर. धायडे, शोभालाल कनिसे, संजय राठोड, आर.आर. लांडगे, एन.जे. पळशे, प्रफुल देगावकर, एन.एम. घुगे, एस.आर. चव्हाण, रतन धोंगडे, अनिल कड आदींसह कर्मचारी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)