शफीपूरला आठवीचा वर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST2021-02-05T04:13:21+5:302021-02-05T04:13:21+5:30

-- औरंगाबाद : शफीपूर (ता. कन्नड) येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आठवीचा वर्ग सुरू करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हा ...

Eighth class starts at Shafipur | शफीपूरला आठवीचा वर्ग सुरू

शफीपूरला आठवीचा वर्ग सुरू

--

औरंगाबाद : शफीपूर (ता. कन्नड) येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आठवीचा वर्ग सुरू करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटल्यानुसार, पिशोर-शफीपूर येथील जिल्हा परिषद शाळेची १९२५ मध्ये स्थापना झाली आहे. काही वर्षांपूर्वी या शाळेत आठवीचा वर्ग होता. तो अचानक बंद करण्यात आला. त्याचे कारण अद्याप दिले जात नाही. आठवीचा वर्ग बंद झाल्याने, गावातील गोरगरिबांच्या मुलांना पुढील शिक्षणासाठी खासगी संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. शिक्षणाचा आर्थिक भार उचलणे अनेक पालकांना शक्य होत नसल्याने, मुलांचे शिक्षण बंद झाले आहे. आठवीचा वर्ग सुरू केल्यास विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेणे सहजशक्य होईल, अशी मागणी पालकांनी केली. यावेळी नाना मोकासे, रमेश मोकासे यांच्यासह पालकांनी शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांना निवेदन दिले. यावेळी मुजफ्फर खान पठाण, डॉ. जफर खान, शेख अथर, शफीक सरकार आदींची उपस्थिती होती.

Web Title: Eighth class starts at Shafipur