शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

विशेष पॅकेजसह दुष्काळ जाहीर करा- एकनाथ शिंदे

By admin | Updated: November 15, 2014 23:55 IST

पूर्णा : मराठवाड्यात पिकांची परिस्थिती गंभीर आहे़ दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज देऊन परभणी, हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा,

पूर्णा : मराठवाड्यात पिकांची परिस्थिती गंभीर आहे़ दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज देऊन परभणी, हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करीत या प्रश्नी शिवसेना आंदोलनाची भूमिका घेईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी दिली़
परभणी, हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते पूर्णा तालुक्यातील खुजडा येथे आले होते़ यावेळी आ़राहुल पाटील, आ़ सदा सरवणकर, आ़ सुनील शिंदे, आ़सुभाष साबने, आ़ विजय शिवतारे, आ़ अजय चौधरी, आ़ प्रकाश फातरतेकर, आ़ मंगेश कुडाळकर, आ़ तुकाराम कोत, आ़ रुपेश म्हात्रे, आ़ डॉ़ बालाजी केवीकर आदी उपस्थित होते़ एकनाथ शिंदे यांनी रमाकांत कुऱ्हे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली़ त्यानंतर खुजडा, फुकटगाव येथील शेतकऱ्यांशी चर्चा केली़ आम्हाला नुकसान भरपाईची रक्कम थोडी उशिराने मिळाली तरी चालेल़ पण, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था आधी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी या वेळी केली़ जायकवाडी प्रकल्पाचे पाणी टेल टू हेड असे देणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही़ या बाबत पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा करू, चारा छावण्या उभारण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल, असेही शिंदे यावेळी म्हणाले़ या प्रसंगी सहसंपर्कप्रमुख शिवाजी दळणर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ़ कच्छवे, सखुबाई लटपटे, सुधाकर खराटे, बाळासाहेब जाधव, नितीन कदम, श्याम कदम, राजू एकलारे, मनोज उबाळे, प्रा़ गोविंद कदम, काशीनाथ काळबांडे, अ‍ॅड़ राजेश भालेराव, शंकर गलांडे, गजानन हिवरे, किशोर सरोदे, मुंजा कदम आदी पदाधिकाऱ्यांसह मुरलीधर कुऱ्हे, बापूराव कुऱ्हे, नरहरी कुऱ्हे, रोहिदास बोकारे, माणिका बोकारे, सुभाष बोकारे, तुळसीराम बोकारे, जगन्नाथराव मोरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)