शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

आयात शुल्क वाढताच खाद्यतेल वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:41 IST

सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने खाद्येतलांवरील आयात शुल्कात वाढ केली. त्याचा त्वरित परिणाम शनिवारी स्थानिक बाजारपेठेत दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने खाद्येतलांवरील आयात शुल्कात वाढ केली. त्याचा त्वरित परिणाम शनिवारी स्थानिक बाजारपेठेत दिसून आला. सोयाबीनसह सरकी, पामतेलात लिटरमागे ५ रुपयांनी भाव वधारले. मात्र, नवीन आवक वाढल्याने शेंगदाणा तेलाचे भाव लिटरमागे १० रुपयांनी कमी झाले.सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी किमतीत व्यापारी सोयाबीन खरेदी करीत आहेत. नाफेडमार्फत हमीभावात सोयाबीन खरेदीला सुरुवात केली; पण त्याचा त्वरित परिणाम दिसून आला नाही. अखेर केंद्र सरकारने विदेशातून येणाºया खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली. यात आयात शुल्कात प्रत्येकी १५ टक्के वाढ करण्यात आली. यामुळे आता क्रुड पामतेलावर ३० टक्के, रिफाइंड पामतेलावर ४० टक्के, क्रुड सूर्यफूल तेलावर २५ टक्के, रिफाइंड सूर्यफुलावर ३५ टक्के, क्रुड सोयाबीन तेलावर ३० टक्के, रिफाइंड सोयाबीन तेलावर ३५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क जाऊन पोहोचले आहे. याचा त्वरित परिणाम स्थानिक बाजारपेठेवर दिसून आला. होलसेल विक्रीत क्विंटलमागे ५०० रुपयांनी खाद्यतेलात भाववाढ झाली. शहरात ७२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणारे सोयाबीन तेल शनिवारी ७७०० रुपये विक्री झाले. तसेच सरकी तेल ७४०० रुपये, तर पामतेल ६९०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले. किरकोळ विक्रीतही लिटरमागे ५ रुपये वाढून खाद्यतेल विक्री करण्यात येऊ लागले आहे. सोयाबीन तेल ७५ रुपये, सरकी तेल ७४ तर पामतेल ६९ रुपये प्रतिलिटर विक्री होत आहे. खाद्यतेलाचे व्यापारी जगन्नाथ बसैये यांनी सांगितले की, नवीन करडीची आवक मार्च-एप्रिल महिन्यात सुरू होईल. करडीची आवक कमी झाल्याने करडी तेलाचे भावही १ हजार रुपयांनी वधारून शनिवारी १३५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले. किरकोळ विक्रीतही १० रुपये वाढून करडी तेल १३० ते १३५ रुपये प्रतिलिटर विक्री होत आहे; पण या भाववाढीला शेंगदाणा तेल अपवाद राहिले. कारण, नवीन शेंगदाण्याची आवक होत असल्याने या तेलात १० रुपयांनी भाव घटून ११० ते ११५ रुपये प्रतिलिटर विकत आहे. लग्नसराईत सोयाबीन व सरकी तेलाला मागणी असते. खाद्यतेलाच्या भावात लिटरमागे १ रुपयांचा फरक असल्याने सोयाबीन जास्त विकल्या जाईल.