शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

‘मनोधैर्य’ योजनेला उदासिनतेचे ग्रहण

By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST

उस्मानाबाद : अत्याचार पीडित महिलांचे मनोधैर्य उंचावे पर्यायाने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने शासनाने ‘मनोधैर्य’ ही योजना सुरू केली. परंतु,

उस्मानाबाद : अत्याचार पीडित महिलांचे मनोधैर्य उंचावे पर्यायाने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने शासनाने ‘मनोधैर्य’ ही योजना सुरू केली. परंतु, योजनेला शासनाच्या उदासिनतेचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात अत्याचाराच्या ४८ घटना घडल्या असून, ही प्रकरणे निकालीही निघाली. परंतु, पीडितांना आर्थिक मदत करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्यामुळे या योजनेच्या माध्यमातून पीडितांचे मनोधैर्य उंचावण्याऐवजी खचत असल्याचे दिसत आहे. जिल्हाभरात मागील तीन महिन्यामध्ये महिला व बालकांवरील अत्याचाराच्या एक -दोन नव्हे, तर तब्बल ४८ घटना घडल्या. यामध्ये विनयभंग, बलात्कार आदी घटनांचा समावेश आहे. यातील ३२ प्रस्ताव या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरविण्यात आले. तर १६ प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडून सांगण्यात आले. या पीडितांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे तसा पत्रव्यवहारही करण्यात आला. परंतु, शासनाने अद्याप आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिलेली नाही. एकीकडे पंधरा दिवसांत संबंधित पीडितास आर्थिक मदत झाली पाहिजे, असे शासन सांगत असतानाच दुसरीकडे चार ते पाच महिने निधी उपलब्ध होत नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. (प्रतिनिधी)अत्याचाराची एखादी घटना घडल्यानंतर माहिती मिळाल्यापासून सात दिवसांत बैठक घेणे आणि पंधरा दिवसात अर्थसहाय्य देणे बंधनकारक आहे. अर्थसहाय्य खात्यावर जमा झाल्यानंतर त्यापैकी ७५ टक्के रक्कम किमान तीन वर्षासाठी मुतद ठेव स्वरूपात ठेवण्यात येते. उर्वरित २५ टक्के रक्कम पीडित वा पालकांना खर्च करता येते. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना मात्र, ७५ टक्के रक्कम खर्च करता येते. उर्वरित २५ टक्के रक्कम तीन वर्षासाठी मुदत ठेव स्वरूपात ठेवता येतात.बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला वा बालकांना अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘मनोधैर्य’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लैंगिक अत्याचार, बलात्कार पीडितांना किमान दोन लाख तर कमाल तीन लाखांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. अ‍ॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यास वा कायमचे अपंगत्व आल्यास किमान तीन लाख व जखमी झाल्यास ५० हजार रूपये दिले जातात.