शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

सा़बां़ विभागाचा गोंधळ

By admin | Updated: May 13, 2014 01:04 IST

भोकर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे एका गुत्तेदाराकडून दुसर्‍या गुत्तेदाराला सर्रासपणे विकल्या जात असल्याने वरच्यावर मलई खाणार्‍यांची संख्या वाढली आहे़

 भोकर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे एका गुत्तेदाराकडून दुसर्‍या गुत्तेदाराला सर्रासपणे विकल्या जात असल्याने वरच्यावर मलई खाणार्‍यांची संख्या वाढली आहे़ पण कामे सुरू होण्यापूर्वीच टक्केवारी चालू झाली असल्याने ही कामे किती चांगली होतील, याबाबत शंका निर्माण होत आहे़ सा़ बां़ च्या या सावळ्या गोंधळाकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे़ भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाची अनेक कामे निकृष्ट दर्जाची करण्यात येत आहेत़ या विभागाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी तक्रार करू नये म्हणून तालुक्यातील काही कार्यकर्त्यांना सा़ बां़ विभाग छोटमोठे कामे देतो़ तर काही गुत्तेदार टेंडरप्रमाणे ही कामे घेतात़ कार्यकर्त्यांकडे कामे करण्याची कोणतीच तयारी नसल्याने ती कामे तब्बल ५ ते ७ टक्के घेवून ही कामे विकली जातात़ तर काही गुत्तेदारांकडे कामाचा बोजा वाढल्याने आपल्याला मिळालेली कामे दुसर्‍या गुत्तेदाराला देत वरच्या वर मलई खाण्याचे काम करतात़ ज्या गुत्तेदाराकडे कसलाच वशिला नाही, ते गुत्तेदार ही कामे विकत घेवून काम सुरू होण्यापूर्वीच टक्केवारी देत आहेत़ कामाच्या सुरुवातीपासूनच टक्केवारी सुरू झाल्याने या कामात किती सच्चेपणा असेल हे समजणारे कोडं आहे़ सदरील कामे परस्पर विकून मलई खाणार्‍यांची संख्या तालुक्यात वाढली आहे़ या बाबीकडे मात्र सर्वजण दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ खड्डे बुजले पण... पावसाळा संपताच भोकरला जोडणार्‍या सर्व रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविले़ पण सद्य:स्थितीत आता हे रस्ते पुन्हा खड्डेमय झाले आहेत़ भोकर, उमीर व भोकर-तामसा हा रस्ता तर खड्डेमय झाला असल्याने वाहने चालविणे अवघड झाले आहे़ उद्योग बंद झालेच नाहीत मागील एका वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे एका विकासकामाच्या भूमिपूजनाच्या वेळी म्हणाले होते की, निधी कमी पडणार नाही, पण कामे दर्जेदार झाली पाहिजेत़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ अन्यथा काम एकाने घ्यायचे, दुसर्‍याला द्यायचे आणि तिसर्‍याने करायचे, हे उद्योगधंदे बंद करा़ अशोकराव चव्हाण यांच्या या सूचनेकडे सा़बां़ विभाग मात्र चक्क दुर्लक्ष करीत हे उद्योगधंदे चालूच ठेवले आहेत़