शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे अन्न-औषध ‘आॅक्सिजन’वर

By admin | Updated: May 3, 2015 00:59 IST

शिरीष शिंदे , बीड अन्न व औषध प्रशासन विभागातील सात पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. एका औषध निरीक्षकावर १३३७ औषधी दुकानांचा कारभार आहे

शिरीष शिंदे , बीडअन्न व औषध प्रशासन विभागातील सात पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. एका औषध निरीक्षकावर १३३७ औषधी दुकानांचा कारभार आहे तर केवळ प्रभारी सहायक अन्न व एका सुरक्षा अधिकाऱ्यावरच जवळपास १० हजार छोट्यामोठ्या दुकानांच्या तपासणीची जबाबदारी आहे. एकंदरीत हे कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी आॅक्सिजनवर आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा संबंधी व औषध सुरक्षा संबंधी सर्व बाबींवर नियंत्रण असते. पहायला गेले तर या कार्यालयाकडे मोठी जबाबदारी आहे. परंतु या कार्यालयातील पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. यामुळे कारभार ढेपाळला आहे.दरम्यान, जिल्ह्यात सद्य परिस्थितीला १ हजार १८७ औषधी दुकाने आहेत. होलसेल औषधी दुकानांची संख्या १५० आहे असे मिळून १ हजार ३३७ औषधी दुकाने आहेत. चार रक्तपेढ्या तर आठ रक्त साठवणूक केंद्रे आहेत. त्यात गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, अंबाजोगाई, नेकनूर येथील केंद्रांचा समावेश आहे. औषधी विभागाकडे सदरील सर्व औषधी दुकानांचे परवाने नूतनीकरण, नोंदणीकरण, सॅम्पल काढणे, औषधी दुकानावर फार्मासिस्ट आहे की नाही याची तपासणी करणे तसेच न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणासाठी हजर राहणे ही प्रमुख जबाबदारी अधिकाऱ्यांवर असते. मात्र, सद्य परिस्थितीला औषध विभागात सहायक आयुक्त, औषध निरीक्षक व कनिष्ठ लिपीक ही तीन पदे रिक्त आहे. सहायक आयुक्तपदी जवळपास दोन वर्षांपासून तर औषध निरीक्षक हे पद एक वर्षापासून रिक्त आहे. अतिरिक्त सहायक आयुक्त पद हे रूपेश व्हटकर यांच्याकडे देण्यात आलेले आहे. कनिष्ठ लिपीक पद रिक्त असल्यामुळे व्हटकर यांना स्वत:च नोटीस काढावी लागते. तसेच त्याचे वितरणही करावे लागते. अतिरिक्त कामाचा ताण त्यांच्यावर पडत आहे.अन्न विभागात फार काही वेगळी स्थिती नाही. सद्य परिस्थितीला मोठ्या दुकानांची संख्या १ हजार ७६० तर छोट्या दुकानांची संख्या ९ हजार ८०६ इतकी आहे. मोठी हॉटेल्स ३९६ तर छोटी हॉटेल्स १ हजार २५ आहेत. याशिवाय छोट्यामोठ्या ढाब्याची संख्या १४७ आहे.या सर्वांचे परवाने काढणे, त्याचे नूतनीकरण करणे, गरज पडल्यास तपासणी करणे यासह इतर महत्त्वाच्या बाबींची जबाबदारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे. अन्न विभागात सहायक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकारी हे पद रिक्त आहे. सहायक आयुक्तांचा पदभार सागर तेरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी डी. जी. वीर हे कार्यरत आहेत. यामुळे दोन अधिकाऱ्यांवर या कामांची जबाबदारी आहे. न्यायालयीन कामकाजासह इतर दैनंदिन काम या अधिकाऱ्यांना करावे लागते. सदरील कार्यालयातील वरिष्ठ लिपीक एस. आर. खोले यांच्याकडे रोखपाल, कार्यालयीन कामकाजाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.