नादुरूस्त रस्त्यामुळे नागरिकांसह व्यापारीही त्रस्त

By Admin | Updated: May 27, 2014 00:58 IST2014-05-27T00:22:27+5:302014-05-27T00:58:34+5:30

कळंब : कळंब-ढोकी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारक, पादचारी तसेच या रोडच्या कडेला व्यावसाय करणारे व्यापारीही त्रस्त झाले आहेत.

Due to the unhappiness of the road, the businessmen also suffer with the citizens | नादुरूस्त रस्त्यामुळे नागरिकांसह व्यापारीही त्रस्त

नादुरूस्त रस्त्यामुळे नागरिकांसह व्यापारीही त्रस्त

कळंब : कळंब-ढोकी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारक, पादचारी तसेच या रोडच्या कडेला व्यावसाय करणारे व्यापारीही त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राष्टÑवादी युवक काँग्रेस शाखेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत रायुकाँच्या वतीने कळंबच्या उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, कळंब-ढोकी रस्त्यावर शिवाजी चौकापासून पुढे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्यावर दगडही पडले असून, रस्त्याच्या बाजुस असणार्‍या दुकानदारांना धुळीचा त्रास होत आहे. याच रस्त्यावर विविध बँका असल्याने कामानिमित्त बँकेत जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांनाही रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागत आहे. याशिवाय एलआयसी कार्यालयासमोर नालीचे कामही अर्धवट असल्याने पावसाळ्यात नाल्या तुंबून घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर एस. व्ही. भवर, तारेख मिर्झा, प्रशांत लोमटे, रणजीत घुले, सुदर्शन कोळपे, महेश पुरी, शंकर खंडागळे, रमेश मोहिते, मयूर वेदपाठक, राहुल कांबळे, आजमत खान, शकील काझी, वैजनाथ आळणे आदींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Due to the unhappiness of the road, the businessmen also suffer with the citizens