शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 02:11 IST

मंगळवारी दुपारच्या सुमारास जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा फार मोठा फटका रबी पिकांना बसला आहे.

रबी पिकांचे नुकसान : जिल्हाभरात दमदार पाऊस गडचिरोली : मंगळवारी दुपारच्या सुमारास जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा फार मोठा फटका रबी पिकांना बसला आहे. ढगाळ वातावरण व पावसामुळे तापमानात घट झाल्याने नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात तूर, मूग, उडीद, जवस, पोपट, कुरता, चना, वटाणा आदी पिकांचे रबी हंगामात उत्पादन घेतल्या जाते. रबी पिकांच्या काढणीचे काम पूर्ण झाले आहे. मळणीचे काम काही शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. तर काही शेतकरी ढिग बनवून ठेवले आहेत. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील वातावरण ढगाळ होते. हवामान खात्यानेही पाऊस येण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे शेतकरी वर्गाने आधीच तयारी करीत पिकांच्या ढिगांवर ताडपत्री, पॉलिथीन झाकून ठेवले. परिणामी पावसामुळे पिकांचे तुलनेत कमी नुकसान झाले आहे. तरीही ज्या शेतकऱ्यांनी ढिगांवर झाकले नव्हते, त्यांचे नुकसान निश्चित आहे. देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी, लखमापूर बोरी, परिसरात दमदार पाऊस झाला. लखमापूर बोरी परिसरात जोराचे वादळ आल्याने अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. रबी पिकांचे ढिग व तणसीचे ढिगही उडून गेले. त्यामळे ढिगात पावसाचे पाणी शिरले. गडचिरोली शहरात जवळपास ५.३० वाजताच्या सुमारास पाऊस झाला. वेळेवर आलेल्या पावसामुळे शहरातील दुकानदार, पादचारी, वाहनधारक यांची तारंबळ उडाली. आणखी ९ तारखेपर्यंत पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाचा धोका कायम आहे. (नगर प्रतिनिधी)