शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत ‘कॅश’ नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित

By admin | Updated: May 19, 2014 01:02 IST

पाटोदा: तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांचे पीक विमा व गारपिटीचे अनुदान येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत आले आहेत.

पाटोदा: तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांचे पीक विमा व गारपिटीचे अनुदान येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत आले आहेत. मात्र या बँकेस स्टेट बँक आॅफ हैदराबाद मधून पुरेशी रक्कम मिळत नसल्याने डीसीसीतून शेतकर्‍यांना पैसे मिळत नाहीत. यामुळे शेतकर्‍यांना बँकेत खेटेही घालावे लागत आहेत. पाटोदा येथे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या बँकेत मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची खाते असल्याने शेतकर्‍यांना येथूनच अनुदान व इतर रक्कम दिली जाते. या बँकेतून सध्या गारपीटीचे अनुदान व पीक विम्याची रक्कम दिली जात आहे. यापोटी तब्बल १२ कोटी रुपये येथून वितरित केले जात आहेत. गारपीट अनुदान वितरणाची नऊ गावे आणि साडेपाच हजार लाभार्थी आहेत. तर पीक विम्याची रक्कम तालुक्यातील साडेआठ हजार शेतकर्‍यांना मिळणार आहे. यामुळे जिल्हा बँकेत पैसे घेण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी होत आहे. या जिल्हा बँकेची ट्रेझरी बँक स्टेट बँक आॅफ हैदराबाद आहे. एसबीएच मधूनच जिल्हा बँकेला पुरेशी रक्कम दिली जाते, मात्र सध्या एस.बी.एच. मधून जिल्हा बँकेला पुरेशी रक्कम दिली जात नसल्याने डीसीसीच्या शाखेतून शेतकर्‍यांना पुरेसे पैसे मिळत नाहीत. यामुळे अनेकदा शेतकर्‍यांना खेटेही घालावे लागतात. यामुळे शेतकर्‍यांची ससेहोलपट होत असल्याने जिल्हा बँकेच्या शाखेला पुरेशी रक्कम देण्याची मागणी आहे. (वार्ताहर) पैसा उपलब्ध होत नसल्याने अडचणी डीसीसी शाखेचे व्यवस्थापक कैलास इंगळे म्हणाले, पुरेसा पैसा उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. वरिष्ठांना कळविले आहे. पुरेसे संरक्षण नाही एसबीएचमधील अधिकारी जे.एस. उजगरे म्हणाले, पुरेसा संरक्षण मिळत नसल्याने पैसा पुरविला जात नाही.