शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीच्या भीतीने शिकवणीला गर्दी

By admin | Updated: June 28, 2014 01:14 IST

बीड : करिअरसाठी कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवले, तरी इंग्रजी भाषेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या वर्गापासून मुलांना इंग्रजीचे धडे मिळावेत, असा पालकांचा अट्टहास आता वाढत चालला आहे.

बीड : करिअरसाठी कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवले, तरी इंग्रजी भाषेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या वर्गापासून मुलांना इंग्रजीचे धडे मिळावेत, असा पालकांचा अट्टहास आता वाढत चालला आहे. त्यातूनच खासगी शिकवण्यांनाही गर्दी वाढत असल्याचे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून दिसून येते. मुले इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असल्यानेच शिकवणी लावल्याचे अनेक पालकांनी म्हटले आहे. तसेच, ‘केजी’पासूनच मुलांना शिकवणीला पाठविले जात असल्याचेही सर्वेक्षणात आढळून आले.आपल्या मुलांना अभ्यासाची सवय लागावी, किंबहुना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहावे, यासाठी त्याला जास्तीत-जास्त पुरक शिक्षण दिले जाते. मग या पुरक शिक्षणासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबले जेतात. योग्य शाळा लावणे, घरी वेळच्या-वेळी अभ्यास घेणे, त्याचबरोबर पाल्यास योग्य शिकवणी लावणे याचे प्रमाण वाढत आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे केजीपासूनच मुलांना शिकवणीला पाठविले जाते. मुले इंग्रजी माध्मयात शिकत असल्याने शिकवणी लावत असल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणानुसार केजी ते इयत्ता चौथीपर्यंत शिकवणी लावण्याचे हे प्रमाण ४० टक्के आहे. साधारणत: एवढेच म्हणजे ३५ टक्के आठवी ते दहावीतील मुले शिकवणीला जातात. इंग्रजी माध्यमामुळे शिकवणी लावली असल्याचे तब्बल ७२ टक्के पालकांनी सांगितले आहे. बदलत्या अभ्यासक्रमामुळे मुलांना शिकवणी लावणे गरजचे झाले आहे. पुढच्या वर्गात जाण्याबरोबरच त्यांचा अभ्यासही वाढत जातो. आठवी व नववी हा दहावीचा पाया मानला जातो म्हणून शिकवणीची गरज पडते. पण, ज्युनियर-सिनियर के .जी. पासूनच मुलांनाही शिकवणी लावण्याचे प्रमाण मोठे असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)...तरीही असमाधानीशिकवणी लावण्यामागे, आपल्या पाल्याची गुणवत्ता वाढावी हा प्राथमिक उद्देश असतो. परंतु, सर्वेक्षणादरम्यान असे दिसून आले, की शिकवणी लावूनही मुलांच्या गुणवत्तेत समाधानकारक वाढ झालेली नाही. तब्बल ५८ टक्के मुलांना शिकवणी लावूनसुद्धा मुलांच्या गुणवत्तेत काही प्रमाणात वाढ झाली आहे, तर ४ टक्के पालकांनी शिकवणी लावूनही मुलांमध्ये काही बदल झाला नसल्याचे सांगितले.