शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 20, 2014 00:59 IST

औरंगाबाद : सर्जा-राजाचा पोळा सण अवघ्या ४ -५ दिवसांवर आलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही, त्यामुळे नदी-नाले, विहिरी जलसाठे जवळपास कोरडे आहेत.

औरंगाबाद : सर्जा-राजाचा पोळा सण अवघ्या ४ -५ दिवसांवर आलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही, त्यामुळे नदी-नाले, विहिरी जलसाठे जवळपास कोरडे आहेत. पावसाळा आता केवळ महिनाभर राहिला असून, दुष्काळाच्या चिंतेने बळीराजा चिंतित झाला आहे; खरीप हंगाम तर गेल्यातच जमा असून चाऱ्याअभावी पशुधनही संकटात सापडले आहे. बाजारही थंडावले आहेत.आतापर्यंत केवळ भीजपाऊस झाला आहे. त्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरणी केली खरी; पण त्यानंतर काही ठिकाणी पाऊस झाला नाही, त्यामुळे पिके सुकत आहेत. ज्यांच्याकडे विहिरीत पाणी आहे, अशांची पिके तग धरून आहेत. आता तर गेल्या १५ दिवसांपासून तर भीजपाऊसही नाही, त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.खरे तर काही भागांत पोळ्याला शेतकरी आर्थिक व्यवहार पूर्ण करतात. पोळ्यापर्यंत पिके आलेली असतात. यंदा तशी परिस्थितीच नाही. त्यामुळे पोळा दुष्काळाच्या चिंतेने काळवंडला आहे.चिंचोली लिंबाजी, नेवपूर, वाकी, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर, वडोद, वाहेगाव, बरकतपूर, रायगाव, वाकद, गणेशपूर, शेलगाव, दिगाव, जामडी, दहीगाव परिसरात चालू हंगामात पावसाने सुरु वातीपासूनच लहरीपणा दाखवला आहे. पावसाअभावी चाराच शिल्लक नसल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साठवून ठेवलेल्या चाऱ्यावर व भुशावर आतापर्यंत जनावरांची गुजराण केली; परंतु आता तोही संपल्याने जनावरांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. चारा व पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने शेतकरी आपले पशुधन कवडीमोल भावाने बाजारात नेऊन विकत आहेत.बोरगाव बाजार परिसरातही हेच चित्र आहे. बोरगाव बाजार, खातखेडा, मसला, कोटनांद्रा, डिडगाव, पिरोळा आदी गावांत तर महिनाभरापासून पाऊस पडला नाही. पावसाअभावी मका करपत आहे. बोरगाव अर्ज परिसरात पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळा संपत आला तरीही पाऊस नसल्याने टँकरने तहान भागवावी लागत आहे. गुरांसाठी इतर ठिकाणाहून जास्त पैसे देऊन चारा मागवावा लागत आहे. हाताला काम नसल्याने शेतमजूर बसून असून, रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. लासूरगाव परिसरात पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच आहेत ती पिके हरिण फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.