शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

लांबलेल्या पावसाने उडीद, मूग पेरणीस ‘खो’

By admin | Updated: July 11, 2014 00:58 IST

दिनेश गुळवे, बीड यावर्षी सरासरीपेक्षा तब्बल महिनाभर उशीराने वरूणराजाचे आगमन झाले आहे. यामुळे खरीपातील उडीद, मूग आदी पिकांचा पेरा अडचणीत आला आहे.

दिनेश गुळवे, बीडयावर्षी सरासरीपेक्षा तब्बल महिनाभर उशीराने वरूणराजाचे आगमन झाले आहे. यामुळे खरीपातील उडीद, मूग आदी पिकांचा पेरा अडचणीत आला आहे. यामुळे कृषी विभागाच्या अंदाजापेक्षा हा पिकांचा पेरा घटणार आहे, तर इतर पिकांचा पेरा वाढणार आहे. अशा काळात शेतकऱ्यांना बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाने नियोजनही केले आहे. बीड जिल्ह्यात सरासरी खरिपाचे क्षेत्र ५ लाख ६२ हजार ७०० हेक्टर आहे. गेल्यावर्षी वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्याने तब्बल ७ लाख ८७ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन तब्बल महिनाभर पाऊस न पडल्याने शेतकरी संकटात सापडले होते. आता पाऊस पडू लागला असला तरी काही पिकांच्या पेऱ्यात घट होईल, असा अंदाज कृषी विभागातून व्यक्त होत आहे. अनेक शेतकरी पंचांग, पावसाचे नक्षत्र व पाऊस यावर पेरणीचे नियोजन ठरवित असल्याचे शेतीनिष्ठ शेतकरी विठ्ठलराव कारंडे यांनी सांगितले. यावर्षी मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने खरिपातील मूग, उडीद ही पिके घेण्यास शेतकऱ्यांना अडचण येणार आहे. जिल्ह्यात या पिकांचा पेरा तब्बल वीस हजार हेक्टरवर असतो. आता हे क्षेत्र बाजरी, कपाशी, मका या पिकांकडे वर्ग होईल, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. उशिरा पडलेल्या पावसामुळे बाजारीचा पेरा ९८ हजार ५०० हेक्टरवर होऊ शकतो, असा कृषी विभागातून सांगण्यात आले. यामुळे बाजरीचे बियाणेही साहजिकच अधिक लागणार असल्याने बियाणांची मागणीही २ हजार ४६३ क्विंटलने वाढली आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरावासध्या शेतकरी पेरणी करू लागले आहेत. असे असले तरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्ती येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अगामी काळातही अशी आपत्ती आल्यास शेतीपिकांचे मोठे नुकसान होईल. यामुळे अशावेळी मदत मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.पुरेशा ओलीवर पेरणी करावीजिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सध्या समाधानकारक पाऊस होत असला तरी काही ठिकाणी मात्र पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पेरणी केल्यास शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेशी ओल असेल तरच पेरणी करावी, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक मुळे यांनी व्यक्त केले.