शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

९४ लाखांच्या प्रकरणांवर संशय

By admin | Updated: November 18, 2015 00:41 IST

शिरीष शिंदे , बीड राज्यातील दुष्काळग्रस्त गावामधील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याची घोषणा केली.

शिरीष शिंदे , बीडराज्यातील दुष्काळग्रस्त गावामधील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र, बीड जिल्ह्यातून एकूण २०३ प्रकरणे दाखल झाली असून केवळ धारूर तालुक्यातील पाच सावकारांनी २०० प्रकरणे दाखल केली आहे. या सर्व प्रकरणांवर लेखा परिक्षकांनी संशय व्यक्त केल्याने ही प्रकरणे मंजूर करण्याची रिस्क जिल्हा उप-निबंधक घ्यायला तयार नाहीत, अशी माहिती खास सूत्रांनी दिली.दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज वाढत असल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले होते ते कर्ज शासन भरणार होते. या कर्जापोटी अर्थसंकल्पात विशेष निधीही मंजूर करण्यात आला होता. आतापर्यंत बीड जिल्ह्यासाठी ३० लाख रूपये मिळाले आहेत. या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पात्र प्रकरणे मागविण्यात येत आहेत.दरम्यान, आतापर्यंत धारूर तालुक्यातील पाच सावकारांनी २०० प्रस्ताव सादर केले आहेत. हे सर्व प्रस्ताव ९५ लाख रूपयांचे आहेत. इतर दोन प्रस्ताव बीड तालुक्यातील असून ते दीड लाख रूपयांचे आहेत तर माजलगाव तालुक्यातून दीड लाख रूपयांचा केवळ एकच प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.धारूर तालुकास्तरीय समितीने २०० प्रकरणे मंजुरीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविली आहेत. मात्र, केवळ एकाच तालुक्यात एवढी प्रकरणे कशी काय ? असा संशय बळावला आहे. त्यातच जिल्हा विशेष लेखा परीक्षण अधिकारी वर्ग १ यांनी यावर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे ही प्रकरणे मंजूर करण्याचा पेच जिल्हा उपनिबंधकांसमोर निर्माण झाला आहे. ही प्रकरणे मंजूर केल्यास भविष्यात त्याच्यावर काही आक्षेप येऊ शकतो. तसेच मूळ शेतकऱ्यांवरही अन्याय होऊ शकतो. यामुळे ही प्रकरणे मंजूर करण्यास जिल्हा उपनिबंधक धजावत नाहीत.आता हा चेंडू ते जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात टाकणार आहेत, अशी माहिती खास सूत्रांनी दिली.शेतकरी कर्ज माफी प्रकरणात पात्र प्रकरणे समितीसमोर ठेवली जातात. या समितीत जिल्हाधिकारी हे अध्यक्ष, पोलीस अधीक्षक व जिल्हा विशेष लेखा परीक्षक हे सदस्य आणि जिल्हा उपनिबंधक हे सचिव असतात.४२०३ पात्र प्रकरणे समितीसमोर पुढील आठवड्यात ठेवली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर या सर्व प्रकरणाची पडताळणी झाल्यानंतर मंजुरीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.