शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जुने कावसान गावात बिबट्याने पाडला कुत्र्यांचा फडशा

By admin | Updated: December 16, 2015 00:19 IST

पैठण : पैठण शहरालगत असलेल्या जुने कावसान या गावात सोमवारी (दि़१४) बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडला़ परिसरात बिबट्या अवतरल्याने भीतीचे वातावरण आहे़

पैठण : पैठण शहरालगत असलेल्या जुने कावसान या गावात सोमवारी (दि़१४) बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडला़ परिसरात बिबट्या अवतरल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे़ विशेष म्हणजे वन विभागाने बिबट्याच्या अस्तित्वाच्या पुराव्याचा पंचनामा करून सावधानतेचा इशारा दिला आहे़ बिबट्याच्या भीतीमुळे काही नागरिकांनी शेतात जाणे बंद केले. सोमवारी रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान पैठण ते दक्षिण जायकवाडी रस्त्यावर गोपाळ अप्पासाहेब मापारी हे दुचाकीवरून घरी जात असताना बिबट्या रस्ता ओलांडून उसाच्या शेतात जाताना त्यांना दिसला़ तसेच गाव शिवारातील गट क्रमांक १२० मध्ये कृष्णा बाजीराव बारे यांना, तर गट क्र. ११४ मध्ये अंतिकाबाई भाऊसाहेब भोसले यांनाही परिसरात बिबट्याचे दर्शन झाले़ संभाजी शिंदे, आशिष मापारी, सुदाम निवारे, अमोल कासोदे यांनीही बिबट्या बघितल्याचा दावा केला आहे़ यानंतर एकमेकांनी याबाबत गावकऱ्यांना मोबाईलवरून माहिती देत सावध केले आहे़ दरम्यान, मंगळवारी सकाळी गावातील खंडोबा मंदिरालगत असलेल्या भागात या बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडल्याचे निदर्शनास आले़ भगवान मापारी यांनी वन खात्यास माहिती दिली़ वनपरिक्षेत्र अधिकारी आऱ ए़ नागापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी़ वाय़ बोडखे, वनरक्षक गोविंद वैद्य, के़ व्ही़ राजगे यांनी कर्मचाऱ्यांसह जुने कावसान येथे धाव घेत बिबट्याच्या पदमार्गावरील ठसे घेतले, तसेच नागरिकांचा जबाब घेत पंचनामा केला़