शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचा ॲप्रॉन फक्त कोट नाही, ही एक जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST

औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर पांढरा ॲप्रॉन परिधान केला जातो; परंतु हा फक्त कोट नाही, तर एक जबाबदारी ...

औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर पांढरा ॲप्रॉन परिधान केला जातो; परंतु हा फक्त कोट नाही, तर एक जबाबदारी आहे. साधा इंजेक्शनचा डोस जरी चुकला तरी रुग्णावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मन लावून अभ्यास करावा. वैद्यकीय ज्ञान जोपासण्यासोबत रुग्णांशी संवाद साधावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी ‘डीनस् अ‍ॅड्रेस’ कार्यक्रमात एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात मंगळवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. येळीकर बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख अथिती म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, डॉ. सुधीर चौधरी, डॉ. प्रतीमा कुलकर्णी, डॉ. रेषाकिरण शेंडे, डॉ. सईदा अफरोज, डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची उपस्थिती होती.

डॉ. येळीकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आजचा अभ्यास उद्यावर ढकलू नये. यश मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. पुस्तकांना मित्र केले पाहिजे. ज्ञान शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जबाबदारीचे करिअर निवडले आहे, याचे नेहमी भान ठेवले पाहिजे. पालकांनीही नेहमी मुलांच्या अभ्यासाबाबत जागरूक राहावे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अधिष्ठातांच्या हस्ते ॲप्रॉन प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. आराधना देशमुख, डॉ. प्रतिभा देशमुख, डॉ. सय्यद अश्फाक यांनी केले.

प्रामाणिकपणे काम करा

सुनील चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी मिळविण्याची जिद्द असणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करा. फक्त ते काम प्रामाणिकपणे करा. यश तुमचेच राहील.

फोटो ओळ..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी दीपप्रज्वलन करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण. यावेळी (डावीकडून) डॉ. सुधीर चौधरी, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. प्रतिमा कुलकर्णी, डॉ. भारत सोनवणे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर.