शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅप वापरू नका, शिक्षकांचे परस्परांना आवाहन

By Admin | Updated: December 15, 2014 00:49 IST2014-12-15T00:37:32+5:302014-12-15T00:49:12+5:30

औरंगाबाद : शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅपवर पोस्ट टाकण्यात गुंतलेल्या शिक्षकांसंदर्भातील लोकमतमधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची रविवारी दिवसभर व्हॉटस् अ‍ॅपवर चर्चा होती.

Do not use the Whatsapp app at school time, teachers interact with each other | शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅप वापरू नका, शिक्षकांचे परस्परांना आवाहन

शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅप वापरू नका, शिक्षकांचे परस्परांना आवाहन

औरंगाबाद : शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅपवर पोस्ट टाकण्यात गुंतलेल्या शिक्षकांसंदर्भातील लोकमतमधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची रविवारी दिवसभर व्हॉटस् अ‍ॅपवर चर्चा होती. ‘शाळेच्या वेळेत फक्त अध्ययन आणि अध्यापन करू, तुम्हीही करा’ अशा पोस्ट बहुतांश शिक्षक व शिक्षक संघटना एकमेकांना टाकत होत्या.
शाळेच्या वेळेत शिक्षकांचा व्हॉटस् अ‍ॅपचा वाढलेला वापर हा ग्रामस्थांच्या नजरेतूनही सुटलेला नाही. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाभरातून अनेक ग्रामस्थांनी लोकमतशी संपर्क साधून अभिनंदन केले. तसेच शिक्षक व शिक्षक संघटनांनीदेखील या वृत्ताचे कौतुक करीत हा प्रकार खूपच वाढला होता, अशी कबुली दिली.
लोकमतमधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या छायाचित्राची पोस्ट बहुतांश ग्रुपमधून फिरत होती. त्याला प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत होता.
शिक्षकांचे शिक्षकांना आवाहन
शाळेत मोबाईल वापरण्यावर शासनाने बंदी घातलेली आहे. त्यामुळे शिक्षकांनी या नियमाचे पालन करावे, शाळेच्या वेळेत मोबाईलच वापरू नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस
सुनील चिपाटे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, शिक्षक समितीचे दिलीप ढाकणे आदींनी केले आहे.

Web Title: Do not use the Whatsapp app at school time, teachers interact with each other