शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाईन फ्ल्यू’बाबत जिल्हा रूग्णालय ‘अलर्ट’

By admin | Updated: February 1, 2015 00:57 IST

उस्मानाबाद : औरंगाबादहून लातूरपर्यंत फैलाव झालेला ‘स्वाईन फ्ल्यू’ आजाराने जिल्ह्यात पाय पसरू नये, यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय सज्ज झाले आहे़

उस्मानाबाद : औरंगाबादहून लातूरपर्यंत फैलाव झालेला ‘स्वाईन फ्ल्यू’ आजाराने जिल्ह्यात पाय पसरू नये, यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय सज्ज झाले आहे़ जिल्हा रूग्णालयात संशयीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे़ तसेच तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ जिल्हा रूग्णालयात आजवर संशयीत रूग्ण आढळला नसल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले़महाराष्ट्रात चालू वर्षाच्या प्रारंभीच स्वाईन फ्ल्यूचे संशयीत रूग्ण आढळल्याने दहशत पसरली होती़ त्यानंतर औरंगाबाद व लातूर येथेही संशयीत रूग्ण आढळून आले आहेत़ त्यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा आरोग्य विभागाने स्वाईन फ्ल्यूला रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत़ जिल्हा रूग्णालयात स्वाईन फ्ल्यूबाबत प्रशिक्षण घेतलेले तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह काही कर्मचारी कार्यरत करण्यात आले आहेत़ जिल्हा रूग्णालयाकडे ५००० मास्क, स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांसाठी लागणाऱ्या ६५०० गोळ्यांचा साठा आहे़ तसेच ऐनवेळी लागणारे चार व्हेंटीलेटरही आहेत़ दैनंदिन कामकाजावेळी एखादा संशयीत रूग्ण आढळून आला तर त्याची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ शिवाय रूग्ण आढळून आलेच तर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था करण्यात आली आहे़ शिवाय जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रूग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वाईन फ्ल्यूबाबत दक्षतेच्या सूचना देण्यात आल्याचे रूग्णालयीन सूत्रांनी सांगितले़ दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना तीन-चार दिवसांपेक्षा अधिक सर्दी-खोकला असेल तर तपासणी करून घेणे आवश्यक आहे़स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या संशयित रूग्णांची जिल्हा रूग्णालयात तपासणी करण्यात येत आहे़ एखादा संशयीत रूग्ण आढळला तर त्याला देण्यासाठी लागणाऱ्या ‘टॅमीफ्ल्यू’ या ६५०० गोळ्या जिल्हा रूग्णालयाकडे उपलब्ध आहेत़ स्वतंत्र वार्डाची उभारणी करण्यात आली असून, वैद्यकीय अधिकारीही नियुक्त करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ वसंत बाबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़