शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

जीवन गौरव पुरस्काराने कुलगुरू सन्मानित

By admin | Updated: July 18, 2016 01:11 IST

‘एनआयसीईआर’ या राष्ट्रीय संस्थेने दिल्ली येथे एका कार्यक्रमात कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत’ उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘एनआयसीईआर’ या राष्ट्रीय संस्थेने दिल्ली येथे एका कार्यक्रमात कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ क्लीनलिनेस एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’चे संपादक उत्कर्ष शर्मा यांनी ‘वर्ल्ड युथ स्कील्स डे’ निमित्त या पुरस्काराची घोषणा केली. ‘एनआयसीईआर’ ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे. या संस्थेच्या वतीने १५ जुलै रोजी ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड युथ स्कील्स’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बल्गेरियाचे राजदूत पेटको डॉयकोव्ह, इंडोनेशियाचे राजदूत मोझेस टँडंग लेलाटिंग, इंदिरा गांधी तंत्रज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पी. आर. त्रिवेदी आदींच्या हस्ते कुलगुरूडॉ. चोपडे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. चोपडे यांनी गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात जलयुक्त विद्यापीठ, स्वच्छता मोहीम यामध्ये केलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. रासेयो समन्वयक डॉ. राजेश करपे यांनी या मोहिमेत योगदान दिले आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ क्लीनलिनेस एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ या दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या अंतर्गत स्वच्छतेसंदर्भात विविध अभ्यासक्रम प्रशिक्षण, कार्यक्षमता, जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. चोपडे यांनी दिली.