धनादेशाचा अनादर; महिन्याची शिक्षा

By Admin | Updated: August 18, 2015 23:48 IST2015-08-18T23:48:50+5:302015-08-18T23:48:50+5:30

बीड : धनादेशाचा अनादर झाल्या प्रकरणी येथील महादेव शामराव गायकवाड यास जिल्हा न्यायालयातील तिसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कामगौडा यांनी त्यास

Disrespect of the check; Monthly education | धनादेशाचा अनादर; महिन्याची शिक्षा

धनादेशाचा अनादर; महिन्याची शिक्षा


बीड : धनादेशाचा अनादर झाल्या प्रकरणी येथील महादेव शामराव गायकवाड यास जिल्हा न्यायालयातील तिसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कामगौडा यांनी त्यास एक महिन्याची शिक्षा व धनादेशाची ३० हजार रुपयांची रक्कम परत देण्याचे आदेश मंगळवारी दिले.
शाम मारुती साळवे यांनी महादेव शामराव गायकवाड यांना हातऊसणे म्हणून ३० हजार रुपये दिले होते. सदर रक्कम परत देण्यासाठी गायकवाड याने साळवे यांना गजानन नागरी सहकारी बँक बीडचा ३० हजार रुपयांचा चेक दिला होता. सदरचा चेक साळवे यांनी बँकेत वटण्यासाठी जमा केला असता ते अनादरीत झाला. म्हणून साळवे यांनी न्यायालयात धाव घेतली.
अ‍ॅड. अनिल सुतार सांनी त्यांनी प्रकरण न्यायालयासमोर सादर केले. हे प्रकरण तिसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कामगौडा यांच्या कोर्टात चालले. (प्रतिनिधी)

Web Title: Disrespect of the check; Monthly education