सवलत पासच्या कक्षाला टाळे !

By Admin | Updated: January 5, 2015 00:38 IST2015-01-05T00:13:57+5:302015-01-05T00:38:26+5:30

सोमनाथ खताळ , बीड येथील बसस्थानकातील सवलत पास देण्यात येणारे कक्ष ‘रविवारीही चालू ठेवावेत’

Discounts pass the closure! | सवलत पासच्या कक्षाला टाळे !

सवलत पासच्या कक्षाला टाळे !


सोमनाथ खताळ , बीड
येथील बसस्थानकातील सवलत पास देण्यात येणारे कक्ष ‘रविवारीही चालू ठेवावेत’ असे आदेश आहेत़ मात्र प्रत्यक्षात रविवारी हा कक्ष बंदच असतो़ ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमधून हा प्रकार समोर आला़
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी येत असतात. अनेक गावात शिक्षणाची सोय नसल्याने ते ज्या गावात शाळा आहे, अशा ठिकाणी शिक्षणासाठी जात असतात. अंतर लांब असल्याने खाजगी वाहनाने जाण्यापेक्षा महामंडळाची सवलत पास काढून प्रवास करणे पसंत करतात. मात्र येथील विभागीय कार्यालकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात आहे.
‘लोकमत’ प्रतिनिधी विद्यार्थ्याच्या भूमिकेत स्टिंगसाठी गेले़ हा कक्ष कुलूपबंद होता़ तक्रार करायला स्थानक प्रमुख हजर नव्हते़ विभागीय कार्यालयात गेल्यावर तिथेही नियंत्रक दौरे करण्यात व्यस्त होते़ त्यामुळे तक्रार करावी तर कोणाकडे अशी परिस्थिती होती़
हा कक्ष व्यवस्थितपणे चालू ठेवून विद्यार्थ्यांचे हाल थांबवावेत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एसएफआय, एआयएसएफ या विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. याबाबत विभागीय नियंत्रक पी़ बी़ नाईक यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, ते संपर्काबाहेर होते़
हेळसांड थांबणार कधी ?
सवलत पासचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना विद्यार्थ्यांच्या नाकी नऊ येतात़ कक्ष बंद राहत असल्याने तासिका बुडवून चकरा माराव्या लागतात़

Web Title: Discounts pass the closure!