शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वंचित शेतकर्‍यांना अजूनही मदत मिळेना

By admin | Updated: May 19, 2014 00:16 IST

पालम : तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी अनुदान वाटप सुरू आहे़ या यादीमधून अनेक शेतकर्‍यांची नावे वगळण्यात आले आहेत़ या वंचित शेतकर्‍यांना अजूनही मदत मिळालेली नाही़

पालम : तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी अनुदान वाटप सुरू आहे़ या यादीमधून अनेक शेतकर्‍यांची नावे वगळण्यात आले आहेत़ या वंचित शेतकर्‍यांना अजूनही मदत मिळालेली नाही़ यामुळे शेतकरी वर्गात प्रशासनाबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे़ पालम तालुक्यात २८ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत विविध भागात जोरदार गारपीट झाली होती़ गारपिटीमुळे शेतामधील उभी पिके जमीनदोस्त झाली़ गहू, ज्वारी, करडई व फळबागा या पिकांना सर्वाधिक फटका बसला होता़ शासकीय यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे केले़ पण अजूनही काही गावातील याद्या करण्याचे काम सुरूच आहे़ तलाठ्यांकडून दलालांमार्फत शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत़ अनुदानाच्या याद्या बँकेकडे पाठविण्यात आल्या आहेत़ परंतु, याद्या पाठविलेल्या गावातील अनेक शेतकर्‍यांची अनुदानाच्या यादीत नावेच नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे़ निसर्गाने संकटात पकडलेल्या शेतकर्‍यांसमोर प्रशासनानेही अडचणी निर्माण केल्या आहेत़ शेतकर्‍यांच्या नावे जमिनी असूनही शेतकर्‍यांच्या शेतात गारपीट कशी झाली नाही असा सवाल वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांमधून होत आहे़ (प्रतिनिधी)