शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

राजुरेश्वर मंदिर विकासाच्या आशा पल्लवित

By admin | Updated: May 28, 2014 00:24 IST

श्याम पुंगळे , राजूरखा.रावसाहेब दानवे यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याने राजूरेश्वर मंदिराच मोठा विकास साधला जाईल.

 श्याम पुंगळे ल्ल राजूर भोकरदन तालुक्याचे भूमिपुत्र खा.रावसाहेब दानवे यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याने राजूरेश्वर मंदिराला भरभरून निधी मिळून निश्चितच मोठा विकास साधला जाईल. अशी अपेक्षा ग्रामस्थातून व्यक्त केली जात असून राजूरेश्वर मंदिराच्या विकासाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी राजुरेश्वर मंदिराला ब दर्जा प्राप्त झाला आहे. त्यादृष्टीने गणपती संस्थानने सुमारे ६० कोटी रूपये खर्चाचा विकास आराखडा शासनाला सादर केला आहे. परंतु अद्याप निधी न मिळाल्याने परिसर विकास कामे संथ गतीने सुरू आहे. खा.रावसाहेब दानवे यांचा मंंंंंंंंंंंंंंंंंत्रिमंडळात समावेश झाल्याने मंदिर परिसर विकास कामाला निधी मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. विशेष म्हणजे दानवे हे गणपती संस्थानचे विश्वस्त सचिव आहेत. त्यामुळे ते मंदिर परिसर विकास कामाकडे विशेष लक्ष देऊन शिर्डी, शेगावच्या धर्तीवर राजुरेश्वर मंदिराचा विकास साधून कायापालट करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या राजूर येथे भाविकांसाठी भक्तनिवास, व्यापारी गाळे, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालय आदी समस्या आहेत.तसेच जालना भोकरदन रस्त्याचे काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे. हा राज्य महामार्ग असून राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचा राबता अधिक आहे. रस्त्याचे काम झाल्यास दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढून या मार्गावर दळणवळण वाढणार आहे. जालना भोकरदन रस्त्याला जनता अक्षरश: कंटाळलेली आहे. मात्र दानवेंच्या रूपाने रस्त्याचे भाग्य उजळण्याची आशा नागरिकांत निर्माण झाली आहे. तसेच राजूर ते फुलंब्री, राजूर ते टेंभूर्णी या रस्त्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. त्यातच शेतकरी हितासाठी अपूर्र्ण असलेल्या बाणेगाव व पळसखेडा खरात येथील मध्यम प्रकल्पाच्या कामाला गती देऊन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन हा परिसर सुजलाम् सुफलाम् करतील, असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे. बाणेगाव मध्यम प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी जालना भोकरदन मुख्य रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे. प्रकल्पाची उंची वाढवता येणार आहे. पळसखेडा खरात येथील मध्यम प्रकल्पाच्या कामात प्रमुख अडसर असलेल्या हिवरा दाभाडी येथील ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे आवश्यक आहे. पळसखेडा येथील प्रकल्प पुर्णत्वास जाऊन परिसरातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन शेतकर्‍यांंचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. राजूर परिसरात शैक्षणिक व आरोग्य सुविधा काही प्रमाणात समाधानकारक असल्या तरी त्यामधे सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. दानवे तालुक्याचे भूमिपुत्र असून त्यांना या भागातील खडान्खडा माहीती आहे, त्यामुळे वरील समस्यासह अन्य प्रलंबित कामे ते निश्चित मार्गी लावून मंत्रिपदाचा सदुपयोग या भागासाठी करतील, असा विश्वास नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.