शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग ओस

By admin | Updated: June 2, 2014 01:08 IST

जिंतूर : खरीपपूर्व हंगामात विविध बियाणे तसेच कीटकनाशके, माती परीक्षण, पिकांची निवड यावर मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याऐवजी

जिंतूर : खरीपपूर्व हंगामात विविध बियाणे तसेच कीटकनाशके, माती परीक्षण, पिकांची निवड यावर मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याऐवजी तब्बल १५ ते २० दिवसांपासून या कार्यालयात एकही अधिकारी हजर राहत नसल्याचे चित्र आहे. येथील तालुका कृषी कार्यालय हे गावापासून तीन कि.मी.अंतरावर आहे. कार्यालयाचा कारभार सेलू येथील तालुका कृषी अधिकारी रोडगे यांच्याकडे देण्यात आला आहे. प्रभारी कारभार असल्याने रोडगे महिन्यातील मोजक्याच दिवशी जिंतुरात येतात. कार्यालयप्रमुखच येत नसल्याने इतर अधिकार्‍यांना तर रान मोकळे झाले आहे. मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक यांचा तर कार्यालयात पत्ताच नसतो. विशेष म्हणजे अवघ्या आठ दिवसांवर खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. या हंगामात शेतकर्‍यांना विविध बियाणांच्या संदर्भात खत- कीटकनाशक, माती परीक्षण, पीक पद्धती व वातावरणाशी समरस होत कोणती पिके कोणत्या भागात घ्यावीत, यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. परंतु, या विभागातील अधिकार्‍यांना मार्गदर्शनाऐवजी विविध कामे असतील तरच कार्यालयात यावेसे वाटते. संबंधित मंडळ अधिकारी व पर्यवेक्षक तसेच कृषी सहाय्यक साईड व्हीजीटच्या नावाखाली महिना -महिना गायब असतात. त्यामुळे शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडण्याचे काम या विभागाकडून होत आहे. (वार्ताहर) तालुका कृषी कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकार्‍यावर असल्याने कार्यालयावर कोणाचेही नियंत्रण नाही. ६० ते ७० कर्मचारी असलेल्या कार्यालयात केवळ तीन ते चार व्यक्ती हजर असतात. परिणामी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकर्‍यांना विविध योजनांची माहिती, अनुदानाची माहिती, शेती औजाराची माहिती घेता येत नाही. अधिकारी कायमस्वरुपी नसल्याने कर्मचारीही उंटावरुन शेळ्या राखण्याचे काम करत आहेत. या कर्मचार्‍यांना कोणाचेही देणे-घेणे नाही. या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकार्‍याची गरज येथील कार्यालयास आहे.