छावणी परिषदेच्या सीईओंनाच डेंग्यू

By Admin | Updated: December 15, 2014 00:51 IST2014-12-15T00:47:35+5:302014-12-15T00:51:22+5:30

औरंगाबाद : छावणीत मागील काही दिवसांपासून डेंग्यूच्या आजाराने सर्वत्र हात-पाय पसरले आहेत.

Dengue only among the CEOs of the camp | छावणी परिषदेच्या सीईओंनाच डेंग्यू

छावणी परिषदेच्या सीईओंनाच डेंग्यू

औरंगाबाद : छावणीत मागील काही दिवसांपासून डेंग्यूच्या आजाराने सर्वत्र हात-पाय पसरले आहेत. खुद्द छावणी परिषदेचे मुख्याधिकारी विनीत लोटे हेही सध्या डेंग्यूसदृश तापाने आजारी असून त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे छावणीतील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
छावणी परिषदेतर्फे साफसफाई आणि कचरा उचलण्याचे कंत्राट खाजगी व्यक्तींना देण्यात आलेले आहे. तरीही ठिकठिकाणी कचरा आणि घाण साचत आहे. शिवाय अनेक ठिकाणी पाण्याची डबकीही साचत आहेत. या सर्वांवर डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत आहे. त्यामुळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापेच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. छावणीतील दानाबाजार, तोफखाना बाजार, गवळीपुरा, पेन्शनपुरा, गड्डीगुडम, कर्णपुरा आदी भागांतून तापेचे रुग्ण छावणीच्या सरकारी रुग्णालयात येत आहेत. यातील अनेक रुग्ण डेंग्यूसदृश तापेचे असून त्यांना छावणीच्या रुग्णालयातून घाटी रुग्णालयात पाठविले जात आहे.
या आजारांची लागण केवळ सामान्य नागरिकांपर्यंत नाही, तर आता ती छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचली आहे. छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत लोटे हेही काही दिवसांपासून तापेने आजारी आहेत. त्यांनाही डेंग्यूसदृश ताप असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे सध्या त्यांना शहरातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलेले असून तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Dengue only among the CEOs of the camp