ऊसाचे पैसे थकविणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:06 IST2021-09-22T04:06:17+5:302021-09-22T04:06:17+5:30
निवेदनात म्हटले आहे की, २०१९ च्या गळीत हंगामात कायगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील साईकृपा सहकारी साखर कारखाना, हिरडगाव ...

ऊसाचे पैसे थकविणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, २०१९ च्या गळीत हंगामात कायगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील साईकृपा सहकारी साखर कारखाना, हिरडगाव (ता. श्रीगोंदा) या साखर कारखान्याला ऊस दिला होता. मात्र, ऊस देऊन दोन वर्षे उलटली तरी त्या साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचे पैसे दिले नाही. तो साखर कारखाना या वर्षी साजन शुगर नावाने सुरू करण्यात आला. दुसरे म्हणजे युटेक शुगर मिल्स (मलकापूर, ता. संगमनेर) या कारखान्याने देखील चालू हंगामातील पेमेंट शेतकऱ्यांना दिले नाही. वास्तविक ऊस तोडून नेल्यावर १५ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देण्याचा नियम आहे. परंतु कारखाने पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे युटेक शुगर मिल व साईकृपा साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे व्याजासह पैसे देण्याचे आदेश देण्यात यावे, अन्यथा त्यांच्यावर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी मंगळवारी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे पुणे येथे शेतकऱ्यांनी केली. या वेळी प्रहार शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शेळके, काशिनाथ धरपळे, विठ्ठल फटांगडे, अनिस सय्यद, गोकुळ चव्हाण आदी उपस्थित होते.
----
फोटो : साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे करण्यात आली. या वेळी उपस्थित शेतकरी.
210921\img-20210921-wa0025.jpg
फोटो :
उसाचे पैसे थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे करण्यात आली.