शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दीपावलीमुळे रेल्वे, बस गाड्या हाऊसफुल्ल!

By admin | Updated: October 25, 2014 23:47 IST

जालना : दीपावलीमुळे एस.टी.बसेस तसेच रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी कायम असून लांबपल्ल्याच्या काही बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

जालना : दीपावलीमुळे एस.टी.बसेस तसेच रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी कायम असून लांबपल्ल्याच्या काही बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीमुळे गाड्या हाऊसफुल्ल होत असून अनेकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.दीपावलीच्या तीन-चार दिवसांपूर्वीपासून बसेस व रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी होत आहे. लांबपल्ल्याचे प्रवाशी अगोदर आरक्षण करूनच प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे दिवसभर आरक्षण खिडकीवरही गर्दी असते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, नांदेड, यवतमाळ, इत्यादी भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. या लांबपल्यांच्या प्रवासाला जाण्यासाठी आरक्षण केल्याशिवाय जागा मिळणे मुश्किल आहे. त्यामुळे प्रवासी काही दिवस अगोदरच आपल्या जागेचे आरक्षण करीत आहेत. यापैकी काही ठिकाणच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या असून काही जादा बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे एस.टी. विभागातील सूत्रांनी सांगितले. बसस्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी होते. यात अबालवृद्धांचा समावेश आहे. दिवाळीमुळे माहेरी जाणाऱ्या महिलांची संख्याही अधिक आहे. काही बसेस वेळेवर लागत नसल्यामुळे प्रवाशांना बराच काळ स्थानकावर थांबावे लागत असल्याचे चित्र आहे. विदर्भाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. रात्री उशिरापर्यंतच्या गाड्या विदर्भातूनच ये-जा करतात. मात्र बीड, सोलापूरकडे जाण्यासाठी रात्री १० नंतर बस मिळत नाही. रेल्वेने तिरूपती, येल्लूर, हैद्राबाद, दिल्ली, मुंबई इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र काही गाड्या थेट तर काही ठिकाणी गाड्या बदलून जावे लागत असल्याने मुंबई, नांदेड, मनमाड, पूर्णा या ठिकाणापर्यंतचे तिकिट प्रवाशांकडून काढले जात आहे. अनेकदा वेळेवर बस किंवा रेल्वे उपलब्ध न झाल्यास काही प्रवाशी ट्रॅव्हल्स गाड्यांचा आधार घेताना दिसत आहे. (प्रतिनिधी)