शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

घरासमोर वाजवणार डफडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:50 IST

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकृषी कर्ज थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर डफडे वाजवून वसुलीसाठी तगादा लावणार, अशी माहिती रमेश आडसकर यांनी पत्र परिषदेत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकृषी कर्ज थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर डफडे वाजवून वसुलीसाठी तगादा लावणार, अशी माहिती रमेश आडसकर यांनी पत्र परिषदेत दिली. ५ आॅक्टोबरपासून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या दालनात झालेल्या या पत्रपरिषदेस माजी संचालक साहेबराव दरेकर, रमेश आडसकर, सुभाषचंद्र सारडा, अशोक पालवे, विलास बडगे, दिनकर कदम, दिलीप हंबर्डे, अनिल सोळंके, विलास सोनवणे, विजयकुमार गंडले, सुहास पाटील, वसंतराव सानप, मधुकर ढाकणे आदी उपस्थित होते.आडसकर म्हणाले की, बँकेने ९८८ कोटी शेतकºयांना, तर ८२ कोटी अकृषी कर्ज वाटप केले. ही आकडेवारी बघता अकृषी कर्जाची थकबाकी रक्कम १२ टक्केही नाही. आम्ही फक्त त्या ठरावावर सह्या केल्यामुळे दोषी आहोत; प्रत्यक्षात लाभ मात्र या बड्या मंडळींनीच उचलला आहे.गेल्या काही वर्षांपासून आम्ही कोर्टाच्या चकरा मारत आहोत. बाकी मंडळी इकडे फिरकतदेखील नाहीत. जनता ही आमच्याकडे आम्हीच बँक बुडविली, या नजरेतून बघत आहे. राजकीय हेव्यादाव्यातून चांगल्या स्थितीत असलेल्या या बँकेची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. १० वर्षांपूर्वी अंबासाखर कारखान्याने कर्ज घेतले होते. त्या बदल्यात आम्ही मद्य प्रकल्प बँकेच्या ताब्यात दिला आणि त्याच्या विक्रीतून कर्ज वसुली करावी असे सांगितले. त्यानंतर मात्र आम्ही, आमच्या कुठल्याही संस्थेने कर्ज घेतले नाही. तरीदेखील केवळ ठरावावर सही म्हणून आम्ही दोषी ठरत आहोत. बँकेला या आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आता आम्हीच पुढाकार घेतला आहे. बीड शहरातील बँकेने नोंदविलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर १४०/१३ यात सात संस्थांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. त्यापैकी तांबेश्वर शेतीमाल पुरवठा संस्था, आदित्य बहुउद्देशीय संस्था, श्रीमती मल्लवाबाई वल्याळ ट्रस्ट सोलापूर, व्यंकटेश्वर अ‍ॅग्रो शुगर शिवणी (ता. लोहा, जि. नांदेड), गजानन सहकारी साखर कारखाना, नवगण राजुरी, खंड औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था अंबाजोगाई या सहा संस्थांनी आपल्यावरील कर्ज बेबाक केले; परंतु जयभवानी सहकारी साखर कारखाना, शिवाजीनगर गढी, ता. गेवराई यांच्यावर जवळपास ३९ कोटी रुपयांचे कर्ज थकबाकीत आहे. अशी बडी मंडळी थकबाकीदारांमध्ये असून, त्याचा फटका सर्वसामान्य शेतकºयांना कर्ज मिळण्यास बसला आहे. अशा थकबाकीदार बड्या मंडळींकडील कर्जवसुलीसाठी ५ आॅक्टोबरपासून मोहीम राबविण्यात येणार असून, त्यात आम्ही सहभागी होणार आहोत, असे या सर्वांनी पत्रपरिषदेत सांगितले.