शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दिन दिन दिवाळी.. गायी-म्हशी ओवाळी...

By admin | Updated: October 25, 2014 23:49 IST

लातूर : एकिकडे फटाके वाजवत नवीन कपडे व पंचपक्वान्न तयार करून दिवाळीचा सण साजरा करणारे, तर दुसरीकडे आपल्या संसारात आर्थिक हातभार लावणाऱ्या

लातूर : एकिकडे फटाके वाजवत नवीन कपडे व पंचपक्वान्न तयार करून दिवाळीचा सण साजरा करणारे, तर दुसरीकडे आपल्या संसारात आर्थिक हातभार लावणाऱ्या गायी-म्हशींची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून लातुरात गवळी समाजाच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली. पाडव्याच्या दिवशी सायंकाळी लक्ष्मी मंदिरासमोर आपल्या पशुधनाची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गवळी समाजातील अनेक तरुणांनी काठी फिरविण्याचा खेळ सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले.गेल्या ५० वर्षांपासून लातूर शहरात गवळी समाज बांधव अनोख्या पद्धतीने दिवाळीचा सण साजरा करतात. आपल्या संसारात व आपल्या आर्थिक उन्नतीमध्ये महत्वाचा वाटा असलेल्या पशुधनांना सोबत घेऊनच दिवाळीचा सण साजरा केला जातो. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी गवळी समाज बांधव आपल्या पशुधनासमवेत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढतात. दरवर्षी या मिरवणुकीत समाजबांधवांचा उत्साह आणि नागरिकांनाही पशुधनाच्या मिरवणुकीचे कुतूहल असते. गांधी चौकात असलेल्या लक्ष्मी मंदिरापासून गवळी समाजाच्या दिवाळी सणाची खरी सुरुवात होते.पशुधनाची पूजा झाल्यावरच सर्व समाज बांधव आपल्या पशुधनासमवेत मिरवणुकीत सहभागी होतात. दिन दिन दिवाळी.. गायी-म्हशी ओवाळी... या प्रमाणे दिवाळीचा सण हा नुसताच मानवजातीचा नसून, त्यात पशुधनाचाही सहभाग परंपरेनुसार चालत आला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून दिवाळी सणाची संस्कृती हळुहळू बदलत चालली आहे. शुभेच्छा देण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. संगणकाचे युग आल्याने दिवाळीचा खरा आनंद लोप पावत चालला आहे. त्यातही गवळी समाज बांधवांनी आपली परंपरा अखंडपणे कायम ठेवली आहे. (प्रतिनिधी)