शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

नफेखोरीच्या नादात प्रवाशांचा जीव धोक्यात

By admin | Updated: May 12, 2014 00:39 IST

औरंगाबाद : विमान कंपन्यांच्या नफेखोरीच्या नादामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. ७ मे रोजी रात्री मुंबईहून आलेल्या जेटच्या विमानाने हार्ड लँडिंग केले.

औरंगाबाद : विमान कंपन्यांच्या नफेखोरीच्या नादामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. ७ मे रोजी रात्री मुंबईहून आलेल्या जेटच्या विमानाने हार्ड लँडिंग केले. त्या विमानातील सुमारे ७० प्रवाशांनी १५ सेकंद थरार अनुभवला. पायलटच्या कौशल्यामुळे मोठा अपघात टळला असला तरी त्या घटनेमागील खरे कारण अजूनही दडवून ठेवण्यात आले आहे. मात्र, ते विमान मुंबईहून निघण्यापूर्वी घडलेला प्रकार काही प्रवाशांनी लोकमतला सांगितला. त्या विमानाला मुंबईहून औरंगाबादला निघण्याच्या वेळेतच गडबड झाली होती. ५.४० ही विमान येण्याची वेळ होती. ते विमान ६ वाजून १० मिनिटांनी आले. विमान टेकआॅफला येण्यापूर्वी क्लिनिंग व लगेजला वेळ जातो. ७ मे रोजी ७० प्रवासी विमानाकडे घेऊन जाण्यासाठी विमानतळाची बस आली. विमानाजवळ बस आल्यावर ती १० ते १५ मिनिटे थांबवून ठेवली. विमानातील लगेज संपताच प्रवाशांना आत सोडण्यात आले. विमानाचे क्लिनिंग व टेक्निकल तपासणी न करताच ते औरंगाबादच्या दिशेने झेपावले आणि या विमानतळावरील धावपट्टीवर घसरले. विमानाच्या तांत्रिक तपासणीचा वेळ कमी करून जास्तीत फेर्‍या मारण्याच्या हव्यासासाठी कंपन्यांकडून असा प्रकार घडत असल्याचे जेटच्या एका प्रवाशाने सांगितले. नियमानुसार तासभर तपासणी नियमानुसार विमान लँड झाल्यावर तासभर त्याची तपासणी केली जावी. त्यानंतर ते पुढील टेकआॅफसाठी तयार करावे. मात्र, अलीकडे विमाने येण्यात, उतरण्यात आणि पुन्हा उड्डाण करण्याच्या वेळेत ताळमेळ राहिलेला नाही. विमानाचे जास्तीत जास्त ‘युटीलायझेशन’ करण्याच्या नादात कंपन्या विमानाच्या तांत्रिक घटकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. २८ मार्चला विमान बदलले दिल्ली विमानतळावरून एअर इंडियाचे एक विमान ३ वाजून १० मिनिटांनी औरंगाबादकडे निघाले. त्या विमानात येथील उद्योगपती व खासदार होते. विमानाने टेकआॅफ करताच काही वेळाने पायलटच्या लक्षात आले की, योग्य उंचीवर ते उडत नाही. त्यामुळे ते विमान पुन्हा विमानतळावर उतरविण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. दोन तासांनी नवीन विमानाने प्रवाशांना औरंगाबादकडे आणण्यात आले. ५ एप्रिल रोजी पुन्हा तेच विमान दिल्लीहून औरंगाबादच्या दिशेने झेपावले. त्या विमानाला पुन्हा तीच अडचण आली. ते विमान औरंगाबादला लँड होताना धावपट्टीची लाईट गेली. २८ मार्चच्या प्रकाराबद्दल उद्योगपती उल्हास गवळी यांनी एअर इंडिया अ‍ॅथॉरिटीकडे तक्रारही नोंदविली आहे.