शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

उंदरांनी पोखरले मॉडेल रेल्वेस्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:04 AM

मालधक्का आणि रेल्वेरुळांवर पडणाºया खाद्यपदार्थांमुळे मॉडेल रेल्वेस्टेशनवर सध्या उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मालधक्का आणि रेल्वेरुळांवर पडणाºया खाद्यपदार्थांमुळे मॉडेल रेल्वेस्टेशनवर सध्या उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे. जागोजागी झालेल्या बिळांमुळे संपूर्ण रेल्वेस्टेशनच उंदरांनी पोखरल्याचे दिसते. रेल्वे प्रशासनाकडून हजारो रुपये खर्च करूनही उंदरांचा नायनाट होत नसल्याने प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.रेल्वेस्टेशनवर उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवरील रुळाखाली उंदरांनी बिळे केली आहेत. प्लॅटफॉर्मवर रेल्वेची वाट पाहत उभे प्रवासी रेल्वे रुळांवर उरलेले खाद्यपदार्थ फेकतात. अस्वच्छता पसरवितात. त्यामुळे उंदरांना सहज खाद्य मिळते. दुसरीकडे रेल्वेतील प्रवासीही उरलेले अन्न बोगीतच टाकतात. बोगींच्या स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष होते. रेल्वेस्टेशनमध्ये रेल्वे दाखल होताच उंदीर बिळाबाहेर पडतात. खाद्यपदार्थांच्या शोधात उंदीर बोगीत शिरत असावेत. त्यामुळे प्रवाशांबरोबर कर्मचारीही हैरान झाले आहेत. रेल्वेस्टेशन परिसरात मालधक्का आहे. या ठिकाणी मालगाडीद्वारे धान्याची ने-आण होते. चढ-उतर करताना मोठ्या प्रमाणात धान्य खाली पडते. यामुळेही उंदरांची संख्या वाढीला हातभार लागत आहे. रेल्वेस्टेशनवरील उंदीर मारण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून कंत्राट दिले जाते. कंत्राटदाराकडून विविध उपाययोजना करून उंदरांचा उच्छाद थांबविला जातो; परंतु आजघडीला रेल्वेस्टेशनवर उंदरांची परिस्थिती पाहता रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसते. यासंदर्भात स्थानिक अधिकाºयांनी बोलण्याचे टाळले. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क अधिकाºयांशी संपर्क साधला असता उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी कंत्राट दिले जाते. रेल्वेस्टेशनवरील सध्याच्या परिस्थितीची माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.