शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

राजीव सातव यांच्या वारसाविषयी उत्सुकता

By admin | Updated: June 12, 2014 00:27 IST

इलियास शेख, कळमनुरी संपूर्र्ण जिल्ह्याच्या राजकीय नेतेमंडळीचे लक्ष लागलेल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात यावेळी प्रमुख राजकीय पक्षांकडून कोणाला उमेदवारी मिळेल, याविषयीची उत्सुकता वाढली आहे.

इलियास शेख, कळमनुरी संपूर्र्ण जिल्ह्याच्या राजकीय नेतेमंडळीचे लक्ष लागलेल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात यावेळी प्रमुख राजकीय पक्षांकडून कोणाला उमेदवारी मिळेल, याविषयीची उत्सुकता वाढली आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव यांनी शिवसेनेचे गजाननराव घुगे यांचा पराभव केला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घुगे यांनी तालुक्यातून १२ पैकी ११ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणून पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दाखवून दिले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव सातव यांनी या मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे त्यांना तब्बल २० हजार ८८ मतांची निर्णायक आघाडी मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघाच्या मतांचा दोलक काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचे दिसून आले. राजीव सातव आता खासदार झाल्याने काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळवू पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये आदिवासी युवक कल्याण संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. संतोष टारफे, माजी शिक्षण सभापती संजय बोंढारे, दिलीप देसाई, बाबा नाईक, जकी कुरेशी यांचा समावेश आहे. असे असले तरी काँग्रेसचा उमेदवार कोण? हे शेवटी राजीव सातव हेच ठरविणार आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडून पुन्हा एकदा माजी आ. गजाननराव घुगे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत कळमनुरी विधानसभेतून काँग्रेसला आघाडी मिळाली. यावरून घुगे यांना शिवसेनेतील अन्य काही नेत्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु घुगे यांच्या समर्थकांनी काही दिवसापूर्वीच प्रसिद्धीपत्रक काढून संबंधितांच्या आरोपांना उत्तर दिले. असे असले तरी घुगे यांनी त्यांच्या गावातून शिवसेनेला आघाडी मिळवून दिली, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. घुगे यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, चंद्रकांत देशमुख, राजेश्वर पतंगे हेही उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खा. शिवाजी माने यांनीही काही दिवसांपूर्वी या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू असल्याचे खासगीमध्ये बोलताना सांगितले होते. मध्येच अ‍ॅड. माने शिवसेनेत जाणार, अशीही अफवा फसरविली गेली. लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. माने यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा प्रचार केला. त्यामुळे या अफवेला काहीसे बळही मिळाले होते; परंतु माने यांनी नंतर राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. याशिवाय मनसे, भारिप बहुजन महासंघ, बसपा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदींचे उमेदवारही ऐनवेळी जाहीर होणार आहेत. असे असले तरी उत्सुकता मात्र काँग्रेस, शिवसेना आणि अ‍ॅड. शिवाजी माने यांच्या उमेदवारीविषयी मतदारांना लागली आहे. काँग्रेसराजीव सातव६७,८०४शिवसेनागजानन घुगे५९,५७७बसपासंतोष टारफे२५,८९३इच्छुकांचे नाव पक्षगजानन घुगे शिवसेनाचंद्रकांत देशमुखशिवसेनाराजेश्वर पतंगेशिवसेनासंतोष बांगरशिवसेनाडॉ. संतोष टारफेकाँग्रेसदिलीप देसाईकाँग्रेसबाबा नाईककाँग्रेससंजय बोंढारेकाँग्रेसजकी कुरेशीकाँग्रेसलोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीरिपा आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांना २०,०८८ एवढे मताधिक्य मिळाले.