शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांमुळे कपाशीसह पिकांचे नुकसान

By admin | Updated: July 19, 2014 00:12 IST

कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात गेल्या काही दिवसात रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. रानडुकरांमुळे कपाशीसह फळबागा व इतर पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात गेल्या काही दिवसात रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. रानडुकरांमुळे कपाशीसह फळबागा व इतर पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गेवराई तालुक्यातील कोळगावसह तांदळा, काजळा, धारवंटा, बंगाली पिंपळा, उक्कडपिंपरी, माणकापूर, शिरसमार्ग, काळेवाडी या परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीसह तूर, भुईमूग या पिकांची लागवड केली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांकडे फळबागाही आहेत. तर सिंदफणा नदीच्या परिसरासह काही शेतकऱ्यांकडे ऊसही आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसात या परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. अनेक ठिकाणी पंधरा ते वीस रानडुकरांचा कळप असल्याचे सर्रास दिसून येते. गेल्या आठवड्यात या परिसरातील शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी केली आहे. मात्र पेरलेले बी रानडुकरे उकरून खात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे महागडे बियाणेही शेतकऱ्यांचे वाया जात असल्याने शेतकरी ही आर्थिक संकटात सापडला आहे. या परिसरातील ऊस व फळबागांचीही रानडुकरांकडून नासधूस होत असल्याचे शेतकरी प्रल्हाद मस्के यांनी सांगितले. या परिसरातील काजळा, तांदळा येथे काही शेतकऱ्यांकडे डाळींब बागा आहेत. या बागांना आता फळ आले आहे. मात्र रानडुकरे फळांसह झाडांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत असल्याचे शेतकरी पप्पू डोंगरे यांनी सांगितले. रानडुकरांचा त्रास वाढला असल्याने परिसरातील काही शेतकऱ्यांनी पिकांना तारांचे कुंपणही केले आहे. तर काही शेतकरी पिकांची रानडुकरांची नासधूस होऊ नये यासाठी रात्री शेतावर राखणीसाठीही जात असल्याचे शेतकरी गुलाब लोंढे यांनी सांगितले.दरम्यान गेल्या काही दिवसात रानडुकरांचा उच्छाद अधिकच वाढला आहे. येथून जवळच असलेल्या शिरसमार्ग येथील शेतकरी पांडुरंग कारंडे यांना रानडुकरांनी जखमी केल्याची घटनाही गेल्या काही दिवसांपूर्वी घडली आहे. रानडुकरांकडून पिकांच्या नासाडीसह शेतकऱ्यावर हल्ला होण्याचे प्रकार वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे या परिसरातील रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भगवान दातखीळ, पप्पूृ डोंगरे, अभिमन्यू कोटुळे, सुनील धस , सुनील शेरकर, नारायण ढगे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात वन विभागाचे अधिकारी जोशी म्हणाले की, जेथे उपद्रव आहे तेथील रानडुकरांचा बंदोबस्त करण्यात येईल.(वार्ताहर)