शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

देशाला सावरकरांच्या विचारांची गरज

By admin | Updated: March 14, 2016 00:41 IST

उस्मानाबाद : देश चहुबाजूने शत्रू राष्ट्राच्या कारवायांमुळे अडचणीत असताना व देशात अतिरेकी कारवाया घडत असताना देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी

उस्मानाबाद : देश चहुबाजूने शत्रू राष्ट्राच्या कारवायांमुळे अडचणीत असताना व देशात अतिरेकी कारवाया घडत असताना देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची गरज असल्याचे मत सावरकर यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक वा. ना. उत्पात (पंढरपूर) यांनी व्यक्त केले. शनिवारी स्वा. सावरकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड’ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, समितीचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, सचिव पांडुरंग पवार, बाबूराव पूजारी आदींची उपस्थिती होती. यावेळी उत्पात यांनी सावरकरांच्या जीवन चरित्रातील अनेक प्रसंग सांगितले. आंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी काव्यप्रतिभा जागृत ठेवली व ‘कमला’ हे महाकाव्य निर्माण केले. १४ वर्षाच्या बंदीवासानंतर सावरकरांची राजकारण न करण्याच्या अटीवर ब्रिटीशांनी मुक्तता करून त्यांना रत्नागिरीत स्थानबध्द केले. परंतु, त्यांनी सामाजिक कार्याच्या आधारे येथे देखील आपली चळवळ सुरूच ठेवली होती, असे उत्पात म्हणाले. रत्नागिरीच्या स्थानबध्दतेत त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी सहभोजन, अस्पृश्यांसाठी हॉटेल उघडले, मंदिर प्रवेशासाठी पतीत पावन मंदिराची निर्मिती आदी समाजोध्दाराचे कार्य सावरकरांनी केले. अन्य कुठल्याही तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी सावरकरांइतका ब्रिटीशांचा अन्याय सहन केला नाही. सावरकर हे थोर साहित्यिक, महान कवी, क्रांतीकारक होते. त्यांनी भाषा शुद्धीचे व मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान दिले. आज देखील रायगडावर स्वातंत्र्यवीर सावरकर रचित शिवरायांची आरती म्हटली जाते, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जयंती समितीचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. यावेळी समितीकडून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन सुवर्णा कांबळे यांनी तर आभार सचिव पांडुरंग पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता गीताताई कोंडो यांच्या वंदे मातरम् गीताने झाली. यावेळी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.