पुरुषोत्तम करवा , माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मागील सात महिन्यांपासून १० जिनिंंगवर कापसाची खरेदी चालू आहे. या हंगामात ५ लाख क्विंटल कापसाची खरेदी यावर्षी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी या खरेदीत दीडपटीने वाढ झाली आहे. माजलगाव तालुक्यात कापसाचा मोठा प्रमाणावर पेरा होत होता. परंतु माजलगाव धरणातील पाण्यावर शेतकरी उसाची लागवड जास्त प्रमाणात करीत असल्यामुळे मागील दहा वर्षात कापूस पेरा कमी झाला आहे. गेल्या वर्षी कापसाचा तालुक्यात ५३ हजार हेक्टरवर पेरा झाला होता. पाऊस वेळेवर पडल्याने कापसाचे पीक चांगलेच जोमात आले होते. यामुळे कापसाची आवकही चांगली होती व ४००० ते ५१०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत आॅक्टोबर २०१३ मध्ये १० खाजगी जिनिंग चालू करण्यात आल्या होत्या. यात मागील सात महिन्यात ४ लाख ९५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. या कापसाच्या उत्पन्नातून शेतकर्यांना २ अब्ज २५ कोटी ४८ लाख १५ हजार रुपये मिळाले असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन नाईकनवरे यांनी दिली. गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाची ३ लाख ६१ हजार ३२१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. यातून १ अब्ज ४७ कोटी ६८ लाख रुपये शेतकर्यांना मिळाले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव डी.बी. फुके यांनी दिली. तसेच यावर्षी हंगाम संपत आला असतानाही दोन महिन्यापूर्वी पाऊस झाला असल्याने उभ्या कापसाला नवे पाते लागू लागले आहेत. त्यामुळे अद्यापही कापसाचे उत्पन्न निघणे सुरुच आहे. जशी पहिली आवक होती त्या तुलनेत सध्या आवक कमी असली तरी पाऊस पडेपर्यंत कापसाची आवक सुरु राहील, असे जिनिंग मालक रामेश्वर टवाणी यांनी सांगितले.४ लाख ९५ हजार क्विंटलची झाली यावर्षी खरेदी २ अब्ज २५ कोटी ४८ लाख १५ हजार रुपये मिळाले शेतकर्यांना गतवर्षी ३ लाख ६१ हजार ३२१ क्विंटल कापसाची झाली होती खरेदी गतवर्षी १ अब्ज ४७ कोटी ६८ लाख रुपये मिळाले होते शेतकर्यांना १० जिनींगवर कापसाची खरेदी
पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी
By admin | Updated: May 27, 2014 00:56 IST
पुरुषोत्तम करवा , माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मागील सात महिन्यांपासून १० जिनिंंगवर कापसाची खरेदी चालू आहे.
पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}