शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाची विरुगिरी

By admin | Updated: May 8, 2014 00:49 IST

परभणी : हायमास्ट दिवे दुरुस्ती होत नसल्याने प्रभाग समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक सचिन देशमुख यांनी विजेच्या खांबावर चढून विरुगिरी करीत आपला रोष व्यक्त केला.

 परभणी : शहरातील देशमुख हॉटेल परिसरातील हायमास्ट दिवे आणि प्रभागातील पथदिवे दुरुस्ती होत नसल्याने प्रभाग समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक सचिन देशमुख यांनी विजेच्या खांबावर चढून विरुगिरी करीत आपला रोष व्यक्त केला. अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनानंतर दोन तासांनी देशमुख यांनी आपले आंदोलन मागे घेतले. शहरातील देशमुख हॉटेल चौकात हायमास्ट बसविलेला आहे. मागील काही दिवसांपासून हायमास्ट दिवे बंद पडलेत. वारंवार पाठपुरावा करुनही हे दिवे बसविले जात नसल्याने बुधवारी नगरसेवक सचिन देशमुख यांनी हायमास्ट दिव्यांच्या खांबावर चढून रोष व्यक्त केला. प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक असलेले सचिन देशमुख यांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास विजेच्या खांबावर जावून आंदोलनाला प्रारंभ केला. भर उन्हात त्यांनी हे आंदोलन सुरु केल्याने सुरुवातीला येणार्‍या-जाणार्‍यांना काही लक्षात आले नाही. परंतु, नंतर महानगरपालिकेचे काही कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी देशमुख यांना खाली येण्याची विनंती केली. परंतु, जोपर्यंत हायमास्ट सुरु करीत नाहीत, तोपर्यंत खाली न येण्याचा पवित्रा देशमुख यांनी घेतला. जवळपास दोन तास हे आंदोलन चालल्यानंतर मनपाच्या अधिकार्‍यांनी हायमास्ट तत्काळ दुरुस्त केला जाईल व दिवे सुरु करण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर सव्वा तीन वाजेच्या सुमारास देशमुख यांनी हे आंदोलन मागे घेतले. नगरसेवक देशमुख खांबावर चढल्याने या परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी) कर्तव्याची जाणीव करण्यासाठी आंदोलन महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आचारसंहितेचा बाऊ करीत लोकांना त्यांच्या मूलभूत सुविधादेखील पुरवित नाहीत. मागील दीड महिन्यांपासून हा हायमास्ट बंद आहे. आचारसंहिता असली तरी नागरिकांना सुविधा पुरविणे हे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे कर्तव्य आहे. परंतु, ते पार पाडत नव्हते. त्यामुळे या अधिकारी- कर्मचार्‍यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी आपण हे आंदोलन केल्याचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी आंदोलनानंतर सांगितले. काम सुरु आहे- मनपा या आंदोलनानंतर महानगरपालिकेचे प्रभारी यांत्रिकी अभियंता रफीक अहमद यांनी सांगितले, हायमास्ट दुरुस्तीचे काम खाजगी एजन्सीला दिले आहे. एजन्सीमार्फत हे काम सुरु आहे. दुरुस्तीसाठी दोन-तीन ठिकाणी लाकडी मचान बसविण्यात आल्या. परंतु, हायमास्टचे साहित्य उपलब्ध नाही. खाजगी कंत्राटदार ते दुसर्‍याकडून उपलब्ध करुन घेत आहेत. या आठवड्यात नादुरुस्त झालेले हायमास्ट दुरुस्त करण्यात येतील. राष्ट्रवादीला घरचा आहेर आंदोलनकर्ते सचिन देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता असून सत्ताधारी नगरसेवकाने आंदोलन केल्याने राकाँला घरचाच आहेर मिळाला आहे.