शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांत मतभेद

By admin | Updated: May 29, 2014 00:51 IST

किनवट : किनवट नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक तथा प्रभारी कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत दुधारे यांची बदली देगलूर येथे झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी ६ नगरसेवकांनी केली आहे़

किनवट : किनवट नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक तथा प्रभारी कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत दुधारे यांची बदली देगलूर येथे झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी ६ नगरसेवकांनी केली आहे़ तर झालेली बदली तूर्त रद्द करण्याची मागणी अन्य ९ नगरसेवकांनी केली आहे़ पाच महिन्यांपूर्वी सर्व नगरसेवकांनी एकजुट होवून तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या बदलीची मागणी केली होती़ आता कर्मचारी दुधारे यांच्या बदली प्रकरणावरून उठलेल्या वादंगाने एकजुट तुटल्याचे दिसून येत आहे़ एका कर्मचार्‍याच्या बदलीप्रकरणी नगरसेवकांनी घेतलेली हटाव-बचावची भूमिका या मागचे रहस्य काय? याची उकल झालेली नाही़ ऩप़चा स्वच्छता निरीक्षकाचा कार्यभार पाहणारे चंद्र्रकांत दुधारे यांच्याकडे कार्यालयीन अधीक्षकाचा कारभार देण्यात आला़ दरम्यानच्या काळात दुधारे यांची बदली इतरत्र झाली, मात्र मुळातच नगरपालिकेत कर्मचार्‍यांची वाणवा असल्याने नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांना सामोरे जाण्याची वेळ येवू नये म्हणून कार्यमुक्त केले नाही़ अशातच दुधारे यांना कार्यमुक्त करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे ऩप़तील काँग्रेसचे गटनेते माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार यांच्यासह शिवसेनेचे गटनेते माजी नगराध्यक्ष सुनील पाटील व बांधकाम सभापती सुरज सातुरवार, नगरसेविका प्रियंका तुम्मलवार, पुष्पा मच्छेवार व अपक्ष नगरसेविका रमा नेम्मीनवार अश सहा नगरसेवकांनी सर्व संबंधितांकडे केली आहे़ तोच दुसर्‍या दिवशी नगराध्यक्ष इंदुताई कनाके, उपनगराध्यक्ष साजीदखान, नगरसेवक इस्तारी माडपेल्लीवार, करूणा आळणे, गजानन बोलचेट्टीवार, अंजली दोनपेल्लीवार, अभय महाजन, प्रियंका राठोड, अनाफा बेगम एस़ अली अशा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नगरसेवकांनी कर्मचारी दुधारे यांची झालेली बदली तूर्त रद्द करण्याची मागणी केली आहे़ राष्ट्रवादीच्या एक नगरसेविका मात्र तटस्थ आहेत़ डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन मुख्याधिकार्‍यांची बदलीसाठी सर्व नगरसेवक एक झाले होते़ आता मात्र हटाव-बचावमुळे उभी फूट पडल्याचे दिसून येते़ (वार्ताहर)किनवट नगरपालिकेत नगररचनांची दोन पदे, लेखापाल लेखापरीक्षणची दोन पदे व कर निर्धारकाची ६ पदे रिक्त आहेत़ आदिवासी तालुक्यातील नगरपालिकेत राज्य संवर्गातील कर्मचार्‍यांची रिक्त पदे असल्याने श्रेणी चार (शिपाई संवर्गातील) कर्मचार्‍यांकडून काम करवून घेतले जात आहे़ अनुभवी संवर्गातील केवळ तीनच कर्मचारी कार्यरत आहेत, परिणामी अनेक समस्या उद्भवू लागल्या तरी शिपाई संवर्गातील कर्मचार्‍यांवर भागवत नगरपालिकेचा कारभार सुरू आहे़