शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने ‘खाल्ली’ हजारोंची ‘ओआरएस’ पावडर; मुदतबाह्य साठ्याची लपवालपवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 18:42 IST

शासनाचे पैसे ‘पाण्यात’, कोरोना काळात ‘ओआरएस’ची पाकिटे कालबाह्य

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोरोनाने हजारो रुपयांची ‘पावडर’ खाल्ल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही पावडर म्हणजे ‘ओआरएस’ची पावडर. पण, घाबरू नका, कोरोना विषाणूने ही पावडर काही खरोखरीच खाल्लेली नाही, तर त्या काळात सर्व यंत्रणा कोविड नियंत्रणात गुंतली होती. तेव्हा हजारो रुपयांची ‘ओआरएस’ची पाकिटे कालबाह्य झाली आहेत. एका कक्षात ‘ओआरएस’ची अनेक खोकी पडून असून, शासनाचे हजारो रुपये ‘पाण्यात’ गेले आहेत.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे बालकांना अतिसाराची लागण होण्याचा धोका वाढतो. अनेकदा अतिसार बालकांच्या जीवावरही उठण्याची भीती असते. त्यामुळे राज्यात १ जुलैपासून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात आला. यामध्ये ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना ‘ओआरएस’चे वाटप करण्यात आले. ही झाली आताची परिस्थिती. परंतु कोरोना प्रादुर्भावात म्हणजे २०२० ते २०२१ या कालावधीत ‘ओआरएस’च्या शेकडो पाकिटांचे वाटपच झाले नसल्याची बाब समोर आली आहे. आमखास मैदानासमोरील जिल्हा नेत्र विभागाच्या एका कक्षात मुदतबाह्य झालेल्या पाकिटांचा साठा ठेवण्यात आला आहे. जवळपास ५० खोकी या ठिकाणी पडून आहेत.

काय आहे तारीख?‘ओआरएस’च्या मुदतबाह्य पाकिटांवर निर्मिती तारीख फेब्रुवारी २०१९ नमूद करण्यात आलेली आहे. तर मुदतबाह्य होण्याची तारीख जानेवारी २०२१ लिहिलेली आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून हा साठा पडून असल्याची परिस्थिती आहे.

बालके राहिली वंचितबालकांमधील अतिसार नियंत्रणासाठी ‘ओआरएस’ देणे महत्त्वपूर्ण ठरते. परंतु ‘ओआरएस’ची पाकिटे मुदतबाह्य झाल्याने कोरोना काळात अनेक बालके त्यापासून वंचित राहिल्याची भीती व्यक्त होत आहे.

आरोग्य अधिकारी म्हणाले...प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अभय धानोरकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्व ‘ओआरएस’चे वाटप केले आहे. सध्या आमच्याकडे साठा नाही. कालबाह्य झालेल्या ‘ओआरएस’विषयी काही सांगता येणार नाही. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. पद्मजा सराफ यांनी सांगितले की, मुदतबाह्य ‘ओआरएस’चे वाटप केले जात नाही. कालबाह्य ‘ओआरएस’संदर्भात माहिती घेतली जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य