शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १२ तास चालली पदवीधर पदोन्नती प्रक्रिया !

By admin | Updated: July 24, 2014 00:11 IST

लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यासंदर्भात बुधवारी आयोजित करण्यात आलेली पदवीधर पदोन्नती प्रक्रिया तब्बल १२ तास चालली़

लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यासंदर्भात बुधवारी आयोजित करण्यात आलेली पदवीधर पदोन्नती प्रक्रिया तब्बल १२ तास चालली़ लोकप्रतिनिधी-संघटना पदाधिकाऱ्यांसमक्ष रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या प्रक्रियेत १५०० शिक्षकांचे समुपदेशन झाले़लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदोन्नती देण्यासंदर्भातचा विषय गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होता़ मार्केट यार्ड येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात बुधवारी जिल्ह्यातील ६०० जागांसाठी १८०० शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आले होते़ जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, शिक्षणाधिकारी शंकर वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीतच तब्बल १२ तास ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली़ बुधवारी पार पडलेल्या १५०० जणांच्या समुपदेशन पदवीधर पदोन्नती प्रक्रियेत अनेकांनी सोयीच्या जागा मिळाल्याने स्विकारल्या़ तर गैरसोयीची जागा मिळत असल्याचे समजताच बऱ्याच जणांनी पदवीधर पदोन्नती नाकारली़ गुरूवारी सेवा ज्येष्ठता अनुक्रमांक १५०० च्या पुढील शिक्षकांचे जि़प़च्या स्थायी समिती सभागृहात सकाळी १० वाजता समुपदेशन होणार आहे़ बुधवारी भाषा समाजशास्त्र व गणित विषयांच्या जागांचे समुपदेशन झाले़ या प्रक्रियेस उपशिक्षणधिकारी राम गारकर, कक्षअधिकारी बालाजी पाटील व आडे यांच्यासह सर्व गटशिक्षणअधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती़ दरम्यान, पदोन्नती प्रक्रियेस जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या सभापतींनी भेट दिली़ कितीही उशीर झाला तरी आजच ही प्रक्रिया पूर्ण करा अशी विविध संघटना पदाधिकारी व शिक्षकांची मागणी होती़ त्यानुसार रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली़ एवढ्या मोठ्या प्रमाणात समुपदेशन प्रक्रिया पार पाडणारा लातूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील, असा दावा उपमुख्यकार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी 'लोकमत'शी बोलताना केला़ कोणत्याही लोकप्रतिनिधी, संघटना पदाधिकारी व शिक्षकांच्या तक्रारीविना बुधवार झालेली पदवीधर पदोन्नती प्रक्रिया सुरळीत पार पडली़प्रकिया पारदर्शक़़़़शासनाच्या नियमानुसार सेवा जेष्ठतेप्रमाणे सर्वांसमक्ष पारदर्शी पध्दतीने मेहनत घेवून ही प्रक्रिया पार पडल्याने प्रशासन अभिनंदनास पात्र ठरले, असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते शिवाजीराव साखरे यांनी व्यक्त केले़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वांच्या अडीअडचणी समजून घेऊन ही प्रकिया पार पाडल्याने प्रशासन अभिनंदनास पात्र ठरल्याचेही साखरे म्हणाले़