कंटेनरने दुचाकीस ५0 फूट फरपटत नेले

By Admin | Updated: November 2, 2014 00:24 IST2014-11-02T00:22:20+5:302014-11-02T00:24:00+5:30

वाळूजमहानगर : वाळूज एमआयडीसीकडे येणाऱ्या दुचाकीस्वारास कंटेनरने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी लिंक रोडवर घडली.

The container took two-and-a-half feet to the floor | कंटेनरने दुचाकीस ५0 फूट फरपटत नेले

कंटेनरने दुचाकीस ५0 फूट फरपटत नेले

वाळूजमहानगर : वाळूज एमआयडीसीकडे येणाऱ्या दुचाकीस्वारास कंटेनरने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी लिंक रोडवर घडली.
रामदास बाजीराव गागरे (५०) हे दुचाकीवर (एम.एच.-२०, जे.-१००८) पैठण लिंक रोड मार्गाने वाळूज एमआयडीसीकडे येत होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास खामनदीच्या पुलाजवळ गतिरोधकावर पाठीमागून स्टील घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर (एम.एच.-३१, सी.क्यु.-६८४४ ) चालकाने त्यांना जोराची धडक दिली.
अपघातानंतर ट्रक चालकाने दुचाकीला जवळपास ५० फूट फरपटत नेले. अपघातात रामदास गागरे गंभीर जखमी झाले. जखमी गागरे यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात
आली.

Web Title: The container took two-and-a-half feet to the floor