शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी सज्जा इमारतींचे बांधकाम रेंगाळले

By admin | Updated: May 19, 2014 01:02 IST

नितीन कांबळे, कडा तालुक्यातील विविध तलाठी सज्जांचे बांधकाम चार वर्षांपासून सुरू आहे.

नितीन कांबळे,  कडा तालुक्यातील विविध तलाठी सज्जांचे बांधकाम चार वर्षांपासून सुरू आहे. यातील काही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. इतर इमारतींचे बांधकाम अपूर्ण असल्याने पूर्ण बांधकाम झालेल्या इमारतींचेही हस्तांतरण रखडले आहे.परिणामी इमारत नसल्याने अनेक तलाठ्यांनी आपले कार्यालय शहरात थाटले आहे. यामुळे शेतकर्‍यांना खेटे घालण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी तलाठी सज्जा आहेत. यातील अनेक कार्यालयांना इमारत नसल्याने हे कार्यालय किरायाच्या खोलीमध्ये सुरू आहेत. तर, ग्रामीण भागात जागेचाही प्रश्न असल्याने काही तलाठ्यांनी आपले कार्यालय चक्क शहरात सुरू केले आहे. तलाठी कार्यालयांना इमारत नसल्याने तलाठ्यांसह शेतकर्‍यांनाही अनेक अडचणींना सामारे जावे लागत आहे. या गोष्टीचा विचार करून चार वर्षापूर्वी तालुक्यातील ४५ तलाठी सज्जांच्या इमारतींना मंजुरी देण्यात आली. यांनतर लगेच काही ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरू झाले. आतापर्यंत १५ तलाठी सज्जांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. इतर इमारतींचे बांधकाम अपूर्ण असल्याने या पूर्ण झालेल्या इमारतींचेही हस्तांतरण रखडलेले आहे. यामुळे तलाठी कार्यालये जुन्याच इमारतींमध्ये सुरू आहेत. तलाठी सज्जांसाठी अनेक ठिकाणी इमारत नसल्याने काही तलाठ्यांनी आपले कार्यालय चक्क आष्टी, कडा शहरात सुरू केले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी सांगितले. तलाठी कार्यालये शहरात असल्याने शेतकर्‍यांना सातबारा, पिकांच्या नोंदी, विहिरीची नोंद, आठ अ चा उतारा काढणे आदी कामांसाठी शहर गाठावे लागत आहे. अनेकदा शेतकरी आपल्या कामानिमित्त तलाठी कार्यालय असलेल्या ठिकाणी जातात, मात्र तेथे त्यांना तलाठी आढळून येत नसल्याने शेतकर्‍यांना आपल्या कामासाठी वारंवार खेटे घालावे लागत असल्याचे अशोक वाघुले, संजय खंडागळे यांनी सांगितले. अनेक सज्जातील तलाठी वेळेवर हजर राहत नाहीत, इतर ठिकाणहून ये-जा करीत असल्याने शेतकर्‍यांची कामे वेळेवर होत नसल्याचे सचिन वाघमारे, गंगाधर खेडकर म्हणाले. अनेक ठिकाणच्या तलाठ्यांनी खाजगी ‘रायटर’ कामावर ठेवले आहेत. अनेकदा तेच तलाठ्यांची कामे करीत आहेत. हे रायटर शेतकर्‍यांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप रवि ढोबळे, सचिन वाघुले यांनी केला आहे. शेतकर्‍यांची कामे वेळेवर व्हावीत, यासाठी इमारतींचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून तेथे सज्जा सुरू करण्याची मागणी सचिन टकले, दादा गव्हाणे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे. या संदर्भात तहसीलदार राजू शिंदे म्हणाले, बांधकाम झाल्यानंतर तेथे कार्यालय सुरू करू. तर सा. बां. चे उपअभियंता पाटील म्हणाले, बांधकाम पूर्ण झाल्यावर हस्तांतर करू.