शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागाची शिरजोरी !

By admin | Updated: November 5, 2014 00:57 IST

जालना : शहरातील रामनगर पोलिस वसाहतीमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने न केलेल्या कामाची देयके उचलूनही कागदांची जुळवाजुळवी केली जात आहे

जालना : शहरातील रामनगर पोलिस वसाहतीमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने न केलेल्या कामाची देयके उचलूनही कागदांची जुळवाजुळवी केली जात आहे. गेल्या १८ वर्षांत एकाही पोलिस वसाहतीमध्ये बांधकाम खात्याने काम केले नाही. मात्र नियमित देयके अदा केली आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलिसांना मात्र सरकारी वसाहतीमध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पाणी, स्वच्छता व देखभाल दुरूस्तीअभावी गाळा धारकांची प्रचंड कुचंबना होत आहे. काही जणांनी तर पदरमोड करून आपल्या गाळ्याची काही प्रमाणात दुरूस्ती करून घेतली आहे. गाळ्यांतर्गत कामे केली असा देखावा निर्माण केला जात आहे. मात्र बाहेर रस्त्यावर सांडपाणी सोडण्याचा नियम बांधकाम खात्याने तयार केला काय? सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारी न बांधताही देयके अदा करण्यात आली आहेत. बांधकाम खात्याची ‘आंधळे दळते कुत्रे पीठ खाते’ अशी अवस्था झाली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या काळात सा.बां. च्या कामांची तपासणी झाल्याने या विभागातील कामकाजास काहीसा सुरळीतपणा आला होता. तशाच प्रकारची तपासणी पुन्हा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)