काँग्रेसचा संकल्प आणि रिपाइंचा कार्यकर्ता मेळावा

By Admin | Updated: July 26, 2014 01:09 IST2014-07-26T01:03:02+5:302014-07-26T01:09:52+5:30

औरंगाबाद : श्रीहरी पार्क येथे काँग्रेसचा विभागीय संकल्प मेळावा व सिडको नाट्यगृहात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे शनिवारी (दि.२६) आयोजन करण्यात आले आहे.

Congress resolution and RPI workers rally | काँग्रेसचा संकल्प आणि रिपाइंचा कार्यकर्ता मेळावा

काँग्रेसचा संकल्प आणि रिपाइंचा कार्यकर्ता मेळावा

औरंगाबाद : श्रीहरी पार्क येथे काँग्रेसचा विभागीय संकल्प मेळावा व सिडको नाट्यगृहात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे शनिवारी (दि.२६) आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री व रिपाइंचे खा. रामदास आठवले आणि चित्रपट अभिनेत्री राखी सावंत शहरात येत आहेत.
विधानसभेच्या तयारीसाठी काँग्रेसतर्फे राज्यात विभागीयस्तरावर पक्ष कार्यकर्त्यांचे संकल्प मेळावे आयोजित केले जात आहेत. शहरात शनिवारी दुपारी १२ वाजता शहानूरमियॉ दर्गा परिसरातील श्रीहरी पव्हेलियनमध्ये मेळाव्यास सुरुवात होईल. आ. माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मेळाव्यास राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा. राजीव सातव, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहील. कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम, सरचिटणीस किरण पाटील, राजकुमार जाधव यांनी केले आहे.
रिपाइंचा मेळावा सिडको नाट्यगृहात दुपारी एक वाजता सुरू होईल. खा. आठवले, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा राखी सावंत, प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर,अविनाश महातेकर, राजा सरवदे, अर्जुन डांगळे, अ‍ॅड. गौतम भालेराव, मिलिंद शेळके, दौलत खरात, कांतीकुमार जैन, पी. के. जैन, ब्रह्मानंद चव्हाण, पप्पू कागदे आदींची प्रमुख उपस्थिती राहील. प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष किशोर थोरात यांनी केले.

Web Title: Congress resolution and RPI workers rally