शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळानेच कॅप राऊंडची सुरुवात

By admin | Updated: July 14, 2014 01:05 IST

औरंगाबाद : अभियांत्रिकी प्रथम वर्षासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची (कॅप राऊंड) पहिली फेरी रविवारपासून सुरू झाली.

औरंगाबाद : अभियांत्रिकी प्रथम वर्षासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची (कॅप राऊंड) पहिली फेरी रविवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर विलंबाने डाटा अपडेट झाल्यामुळे सर्व अर्ज स्वीकृती केंद्रावर (एआरसी) जवळपास २ तास विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. दुपारनंतर प्रवेशफेरी सुरळीत झाली.अभियांत्रिकीसाठी या वर्षी नवीन प्रवेशपूर्व परीक्षा (जेईई) राबविण्यात आली. याशिवाय प्रवेश पद्धतीही नवीनच असल्यामुळे संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे गुण व इतर बाबी अपडेटिंगसाठी विलंब झाल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितले.मराठवाड्यातील ३५ महाविद्यालयातील १६ हजार ४५० जागांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दोन फेऱ्यांद्वारे विद्यार्थ्यांना महाविद्यालय व विद्याशाखांचे विकल्प (प्रिफरन्स) देता येतील. १३ ते १५ जुलैदरम्यान होणाऱ्या पहिल्या फेरीत विद्यार्थी हे कमीत कमी एक व जास्तीत जास्त १०० विकल्प देऊ शकतात. १६ जुलै रोजी विद्यार्थ्यांना गुणवत्ता व आरक्षणानुसार महाविद्यालय व विद्याशाखेचे वाटप होईल. १७ ते १९ जुलैपर्यंत मिळालेल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. एकदा प्रवेश घेतल्यास त्या विद्यार्थ्याचे नाव दुसऱ्या फेरीत (कॅप राऊंड) येणार नाही. दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्याच्या वाट्याला आलेल्या पहिल्या ७ विकल्पांमधूनच पसंतीनुसार प्रवेश घेणे बंधनकारक आहे. २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यातील ६ केंद्रांवर समुपदेशन फेरी राहील. १ ते १४ आॅगस्टपर्यंत विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश दिले जातील. १६ आॅगस्टपासून अभियांत्रिकीचे नियमित वर्ग सुरू होतील.पालकांना झाला मनस्तापसकाळी १० वाजेपासून विद्यार्थ्यांनी ‘एआरसी’वर गर्दी केली होती. सुरुवातीला संकेतस्थळावर प्रवेशफेरीसंबंधीचा डाटा उघडत नव्हता. त्यामुळे रांगेत असलेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. दुपारी १ वाजेपर्यंत अनेक ‘एआरसी’वर हीच परिस्थिती होती. त्यानंतर मात्र कॅप राऊंडची प्रक्रिया हळूहळू सुरळीत सुरू झाली. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सुरुवातीला विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांना चांगलाच मनस्ताप झाला.