शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

अधिक पैसेवारीमुळे सवलती हुकल्या

By admin | Updated: May 8, 2014 00:38 IST

हिंगोली : खरीप हंगामातील जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आढळून आल्याने टंचाईसदृश्य गावांना मिळणार्‍या सवलतींना हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मुकावे लागले आहे.

हिंगोली : खरीप हंगामातील जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आढळून आल्याने टंचाईसदृश्य गावांना मिळणार्‍या सवलतींना हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मुकावे लागले आहे. सन २०१३-१४ च्या खरीप हंगामातील ५० पैशापेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेल्या टंचाई सदृश्य गावांसाठी शासनाने विविध उपाययोजना जाहिर केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सुट देण्यात येणार असून शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगितीही देण्यात आली आहे. या शिवाय वीजबिलात ३३.५ टक्के सुट देण्यात आली असून विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफीही देण्यात आली आहे. रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली असून टंचाई जाहीर केलेल्या गावांमधील शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित करण्यात येवू नये, असेही या आदेशात म्हटले आहे. या सवलती केवळ ५० पैशांपेक्षा कमी आनेवारी असणार्‍या गावांसाठी आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ७०७ पैकी एकही गाव येत नाही. सर्व गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे. शासनाच्या या आदेशाचा राज्यातील २८ हजार ९९१ गावांना लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील यामध्ये एकही गाव नाही. (जिल्हा प्रतिनिधी)