शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा अधिकाऱ्यांविना पाच वर्षांपासून स्पर्धा

By admin | Updated: August 26, 2014 00:04 IST

जाफराबाद : तालुक्यास गत पाच वर्षांपासून क्रीडाधिकारीच नसल्याने तालुक्याचे क्रीडाधोरण तसेच विकास खुंटला आहे. क्रीडायुवक सेवा संचलनालय व जिल्हा

जाफराबाद : तालुक्यास गत पाच वर्षांपासून क्रीडाधिकारीच नसल्याने तालुक्याचे क्रीडाधोरण तसेच विकास खुंटला आहे. क्रीडायुवक सेवा संचलनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय व ग्रामीण पायका तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा गेल्या ११ ते ३० आॅगस्ट दरम्यान होत आहेत. तालुका क्रीडाधिकारी स्पर्धेकरिता उपस्थित असणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून सदरील स्पर्धा क्रीडा अधिकाऱ्यांविनाच सुरु आहेत. परिणामी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या उदासिनतेमुळे भावी उदयोन्मुख खेळाडू स्पर्धेपासून वंचित रहात आहेत.ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्येक खेळात सरस कामगिरी करण्याची क्षमता आहे. परंतु या खेळाडूंना मार्गदर्शनाची गरज आहे. शालेय क्रीडा स्पर्धेत शाळेतील क्रीडा शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम पहात असले तरी प्रत्येक स्पर्धेत आपल्या शाळेचे वर्चस्व टिकून रहावे, यासाठी इतर गुणवंत खेळाडूंचा विचार न करता अन्याय होत असल्याचे अनेक उदाहरण स्पर्धेत पहावयास मिळत आहे. गाव तिथे क्रीडांगण, पंचायतराज क्रीडा अभियान हे शासनाचे खेळाला प्रोत्साहन देणारे उपक्रम आहे. मात्र, या उपक्रमाची माहिती आणि चांगले दर्जेदार खेळाडू निर्माण करण्याकरीता कायमस्वरूपी तालुका क्रीडा अधिकारी देखील आवश्यक आहे. क्रीडा अधिकारी तालुका संयोजक यांच्या भरवशावर गेल्या काही वर्षापासून स्पर्धा घेवून वेळ मारून नेत आहेत. यामुळे स्पर्धेचे आयोजक मनमानी कारभार करून नियमबाह्य गटातटाचे राजकारण स्पर्धेत होताना दिसत आहे. (वार्ताहर)