शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आओ जाओ घर तुम्हारा!

By admin | Updated: October 15, 2016 00:40 IST

जालना : परीक्षा केंद्राच्या परिसरात १०० मीटरपर्यंत परीक्षार्थी व नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक यांच्या व्यतिरिक्त इतरांना मज्जाव असतो.

जालना : परीक्षा केंद्राच्या परिसरात १०० मीटरपर्यंत परीक्षार्थी व नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक यांच्या व्यतिरिक्त इतरांना मज्जाव असतो. तसा फलकही केंद्राच्या बाहेर लावला जातो. परंतु सद्यस्थितीत परीक्षा केंद्रांवर ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती दिसून येत आहे. ‘लोकमत’ चमूने शुक्रवारी स्टींग च्या माध्यमातून हा सर्व गैरप्रकार चव्हाट्यावर आणला. परीक्षेसाठी असणारे सर्व नियम केवळ फलकावरच दिसून आले.डॉ.बाबासाहेब आंबेडेकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेला सुरूवात झाली आहे. या परीक्षेत सर्रासपणे गैरप्रकार आणि नियमांना धाब्यावर बसविले जात असल्याचे उघडकीस आले आहे. जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील परीक्षा केंद्रातील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर जालना शहरातील परीक्षा केंद्रांची शुक्रवारी लोकमत चमूने पाहणी केली. यामध्ये अनेक गैरप्रकारांचा उलगडा काही महाविद्यालयांमधून झाला.विशेष म्हणजे परिसरात परीक्षार्थींशिवाय कोणालाही येण्यास बंदी असते. त्यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला असतो. परंतु शहरातील महाविद्यालयांच्या परिसरात ना पोलीस बंदोबस्त होता, ना कोणाला येण्यास मज्जाव करण्यात आला होता. कोणीही यावे, अन् परीक्षार्थीशी बोलून जावे, अशीच परिस्थिती दिसून आली.