शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

शहरालगतचे सहा पथकर नाके बंद

By admin | Updated: August 19, 2014 02:16 IST

औरंगाबाद : मनपाने पथकर (प्रवेश शुल्क) नाक्याचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रियेच्या हालचाली थांबविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद : मनपाने पथकर (प्रवेश शुल्क) नाक्याचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रियेच्या हालचाली थांबविल्याची माहिती सूत्रांनी दिली. शासनाने पथकर वसुली रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे १५ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून शहराच्या सीमेवर असलेले सर्व ६ नाके बंद करण्यात आले आहेत. पालिकेला यावर्षी पथकर वसुलीतून २२ कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. पथकर वसूल करणे रद्द झाले, तर ही रक्कम एलबीटीमध्ये अधिक करून वसूल करण्यात येण्याची शक्यता आहे. सहकार एजन्सी प्रा. लि. या संस्थेकडे सध्या पथकर वसुलीचे कंत्राट होते.यावर्षी पालिकेला २२ कोटी रुपयांमध्ये ठेका द्यायचा होता. ३ कोटी रुपये पालिकेला नैसर्गिक वाढीनुसार हवे होते. २००६ पासून ३० जून २०११ पर्यंत सहकार एजन्सीकडे जकात वसुलीचा ठेका देण्यात आला होता. त्याच संस्थेला गेल्या वर्षी पथकर वसुलीचे कंत्राट देण्यात आले होते. १ आॅक्टोबर २०१३ ते ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत १७ कोटी २६ लाख रुपयांचे उत्पन्न मनपाला अपेक्षित होते. १ कोटी ९४ लाख रुपये जास्तीचे देऊन १९ कोटी २६ लाख रुपयांत सहकारला कंत्राट देण्यात आले. १ आॅक्टोबर २०१४ ते ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत मनपाला २२ कोटी रुपयांचे उत्पन्न पथकर वसुलीतून हवे होते. मात्र, आता वसुली बंद झाल्यामुळे मनपाचे ते उत्पन्न बुडणार आहे. राज्यभरात सर्व मनपा हद्दींमध्ये पथकर वसूल केला जात होता. १ हजार कोटी रुपयांच्या आसपास ते उत्पन्न होते. शहराच्या हद्दीतून जाणारी वाहने आता मोफत ‘पास आऊट’ होणार आहेत. व्यापाऱ्यांकडे माल घेऊन येणाऱ्या वाहनांच्या नोंदीवरून एलबीटीतून पथकर वसुलीची शक्यता आहे. पथकरातून अपेक्षित २२ कोटींचे उत्पन्न बुडणार असल्यामुळे हे उत्पन्न एलबीटीतून वसूल करण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे. शहरातील जळगाव रोड, जालना रोड, पुणे, नाशिक रोड, पैठण रोडवरील नाके बंद करण्यात आले आहेत. आस्थापना अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी सांगितले की, पथकर नाके १५ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून बंद झाले आहेत.