शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

४०० रुपयांची लाच घेताना लिपिक जाळ्यात

By admin | Updated: December 8, 2015 00:10 IST

औरंगाबाद : जालना येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या कनिष्ठ लिपिकाला ४०० रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.

औरंगाबाद : जालना येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या कनिष्ठ लिपिकाला ४०० रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. सोमवारी ही कारवाई औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जालना येथे केली. शिपाई पदावर कार्यरत महिला कर्मचाऱ्याचे नोव्हेंबर महिन्याचे पगार बिल काढण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.दिनेश कोकाटे (रा. चाणक्य कॉम्प्लेक्सच्या बाजूला, जालना) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. कोकाटे याच्याकडे तेथील कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांची बिले तयार करण्याचे काम आहे. तक्रारदार या तेथे शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पगार बिल तयार करण्यासाठी कोकाटे याने ४०० रुपयांची लाच मागितली. महिला कर्मचाऱ्यास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी औरंगाबादेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे याची पडताळणी करण्यात आली. कोकाटेने सोमवारी लाचेची रक्कम जालना येथे आणून देण्यास सांगितल्यावरून सोमवारी सकाळी ११ वाजता सापळा रचून त्याला पकडण्यात आले. औरंगाबादेत सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विवेक सराफ, पो.नि. अनिता वराडे, श्रीराम नांदुरे, सुनील फेपाळे, अजय आवले, सचिन शिंदे, शेख मतीन यांनी केली.