गेवराई तहसीलमध्ये लाच घेताना लिपिकचतुर्भुज

By Admin | Updated: August 9, 2015 00:31 IST2015-08-08T23:51:46+5:302015-08-09T00:31:33+5:30

गेवराई : तालुक्यातील चकलांबा येथील शेतामधून बैलगाडीसाठी मार्ग काढण्यासाठी एका शेतकऱ्याकडून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना गेवराई तहसील कार्यालयातील

Clerical rhythm while taking bribe in Gevarai tehsil | गेवराई तहसीलमध्ये लाच घेताना लिपिकचतुर्भुज

गेवराई तहसीलमध्ये लाच घेताना लिपिकचतुर्भुज


गेवराई : तालुक्यातील चकलांबा येथील शेतामधून बैलगाडीसाठी मार्ग काढण्यासाठी एका शेतकऱ्याकडून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना गेवराई तहसील कार्यालयातील एका लिपिकास लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी मोठ्या शिताफीने पकडले.
नरेंद्र रमेशराव रूपदे असे त्या लिपिकाचे नाव आहे. तो गेवराई येथील तहसील कार्यालयात कार्यरत आहे. तक्रारदार याचे चकलांबा येथील गट नंबर ४६० मध्ये शेती असून, शेतामध्ये जाण्यासाठी पूर्वी नदीमार्गे रस्ता होता. परंतु सध्या सदरच्या नदीवर जलसंधारण योजनेमार्फत सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी झाल्याने शेताकडे जाण्यासाठी मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे तक्रारदाराने २१ जुलै रोजी गेवराईच्या तहसील कार्यालयात बैलगाडी मार्ग खुला करण्यासाठी अर्ज दिला होता.
दरम्यान, ७ आॅगस्ट रोजी तहसील कार्यालय येथे तक्रारदार गेले असता शेतामध्ये बैलगाडीमार्ग पाहिजे असेल तर ११ हजार रूपये द्यावे लागतील, असे लिपीक नरेंद्र रूपदे यांनी सांगितले. ही शासकीय केस आहे काय ? पैसे दिल्याशिवाय पुढे कारवाई होणार नाही असे रूपदे यांनी सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यावरून शनिवारी पंचासमक्ष मागणीची पडताळणी केली असता लोकसेवक रूपदे यांनी तडजोडीअंती सहा हजार रूपये स्वीकारणे मान्य केले. ही रक्कम स्वीकारताना लिपीक रूपदे यांना शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास एसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले.
गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजय लोहकरे, पो. नि. गोंदकर, वाघ यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली आहे.
(वार्ताहर)

Web Title: Clerical rhythm while taking bribe in Gevarai tehsil